सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात दुपारच्या सुमारास जवळपास 65 मेंढ्या अचानक दगावल्या. तर 100 मेंढ्या अस्वस्थ अवस्थेत होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ॲपल बोर जास्त प्रमाणात खाल्यानेच 65 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पथकाने वर्तवला आहे.
घटनेची माहिती मिळताच मंगळवारी पशुसंवर्धन जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड तथा छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील प्रयोग शाळा विभागीय रोग अन्वेषण डॉ. रोहित घुमाळ, सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी भेट देत मेंढ्या पालन करण्याच्या मेंढपाळांची भेट घेऊन पाहणी केली.
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कासारी येथील साहेबराव मांगू शिंदे, चिंधा विठोबा तुरके, वाल्मीक दशरथ तरके साहेबराव दशरथ तुरके हे मेंढपाळ सध्या सिल्लोडच्या अंधारी शिवारात आपल्या 200 मेंढ्या घेऊन आले आहेत. दरम्यान सोमवारी अंधारी शिवारातील खराते वस्ती परिसरातील ॲपल बोरांच्या बागेत मेंढ्या चरत होत्या.
राज्यावर वादळी पावसाचे सावट कायम, शेतकऱ्यांनो पुढील काही दिवस काळजी घ्या..
दरम्यान अचानक मेंढ्या ओरडू लागल्या आणि एकेक करून जमिनीवर कोसळू लागल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्व मेंढपाळ घाबरले. काय करावे, काही सूचना झाले. दरम्यान याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ अंधारी येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी उपचार केले. मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत किमान 50 मेंढ्यांचा मृत्यू झाला होता.
जगातील सर्वात महागडा आंबा, किंमत आहे 3 लाख रुपये प्रति किलो..
तसेच रात्री 9 वाजेपर्यंत ही संख्या 65 पेक्षा अधिक होती. एवढया मोठ्याप्रमाणात मेंढ्या दगावल्याने मेंढपाळ यांचं मोठं नुकसान झालं आहे. सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत, प्रभारी गटविकास दादाराव आहिरे, मंडळ अधिकारी गजेंद्र चांदे, तलाठी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी मंगळवारी या ठिकाणी भेट देऊन सदरील घटनेचा पंचनामा केला.
ऊस तोडणी यंत्र अनुदानासाठी करा ऑनलाइन अर्ज, 21 एप्रिलपासून सुरुवात
शेतकऱ्यांना दिलासा! आता केंद्रानंतर राज्य सरकार देखील देणार 2 हजार रुपये
पाकिस्तानमध्ये पेट्राेल २८२ रुपये लीटर, देशात मोठे आर्थिक संकट
Share your comments