राज्यात दुसऱ्या टप्प्यात 62.88 टक्के मतदान

Saturday, 20 April 2019 07:21 AM


मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाची अंतिम आकडेवारी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाने जाहीर केली. त्यानुसार दहा मतदारसंघात 62.88 टक्के मतदान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलेल्या सुधारीत माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरची मतदानाची अंतिम टक्केवारी:

 • बुलढाणा 63.53 टक्के
 • अकोला 59.98 टक्के
 • अमरावती 60.36 टक्के
 • हिंगोली 66.52 टक्के
 • नांदेड 65.15 टक्के
 • परभणी 63.19टक्के
 • बीड 66.06 टक्के
 • उस्मानाबाद  63.42 टक्के
 • लातूर 62.19 टक्के
 • सोलापूर  ‎58.45 टक्के
 • एकूण 62.88 टक्के अंतिम मतदान झाले आहे.

हिंगोली मतदारसंघात मतदानाची टक्केवारी सर्वाधिक राहिली असून सर्वात कमी टक्केवारी सोलापूर मतदारसंघाची राहिली.

या टप्प्यात 10 मतदारसंघात एकूण 1 कोटी 16 लाख 61 हजार 830 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये पुरुष 62 लाख 84 हजार 344, स्त्री 53 लाख 77 हजार 434 आणि 52 तृतीयलिंगी मतदारांचा समावेश आहे. बीड मतदारसंघात सर्वाधिक मतदारसंख्या होती. तेथे सर्वाधिक 13 लाख 48 हजार 473 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 7 लाख 31 हजार 196 पुरुष, 6 लाख 17 हजार 276 स्त्री आणि 1 तृतीयलिंगी मतदारांचा समावेश आहे.

मतदारसंघनिहाय मतदान केलेल्या पुरुष, स्त्री व तृतीयलिंगी मतदारांची संख्या आणि झालेले एकूण मतदान पुढीलप्रमाणे:

 • बुलढाणा- पुरुष 6 लाख 782, स्त्री 5 लाख 16 हजार 703, तृतीयलिंगी 1, एकूण 11 लाख 17 हजार 486, 
 • अकोला- पुरुष 6 लाख 6 हजार 922, स्त्री 5 लाख 9 हजार 834, तृतीयलिंगी 7, एकूण 11 लाख 16 हजार 763
 • अमरावती- पुरुष 6 लाख 2 हजार 8, स्त्री 5 लाख 2 हजार 921, तृतीयलिंगी 7, एकूण 11 लाख 4 हजार 936
 • हिंगोली- पुरुष 6 लाख 17 हजार 811, स्त्री 5लाख 34 हजार 736, तृतीयलिंगी 1, एकूण 11 लाख 52 हजार 548
 • नांदेड- पुरुष 5 लाख 94 हजार 614, स्त्री 5 लाख 24 हजार 490, तृतीयलिंगी 12, एकूण  11 लाख 19 हजार 116 
 • परभणी- पुरुष 6 लाख 77 हजार 601, स्त्री 5 लाख 76 हजार 9, तृतीयलिंगी 2, एकूण 12 लाख 53 हजार 612
 • उस्मानाबाद- पुरुष, 6 लाख 41 हजार 697, स्त्री 5 लाख 54 हजार 458, तृतीयलिंगी 11, एकूण 11 लाख 96 हजार 166
 • लातूर- पुरुष 6 लाख 25 हजार 336, स्त्री 5 लाख 46 हजार 5,तृतीयलिंगी 3, एकूण 11 लाख 71 हजार 344
 • सोलापूर- पुरुष 5 लाख 86 हजार 377, स्त्री 4 लाख 95 हजार 2, तृतीयलिंगी 7, एकूण 10 लाख 81 हजार 386.

loksabha Election मतदान निवडणूक लोकसभा

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.