गेल्या काही दिवसांपासून देशात अनेकांच्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहे. याचे मुख्य कारण शेतीमध्ये रसायनांच्या वाढत्या वापरामुळे होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच यामुळे Organic Farming Scheme in India: मातीचे आरोग्य बिघडत आहे. याची मोठी किंमत येणाऱ्या दिवसात चुकवावी लागणार आहे. यामुळे याबाबत सध्या देश सतर्क झाला आहे.
तसेच यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे, त्यासोबत पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे मोदी सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळत नाही, मात्र येणाऱ्या काळात उत्पादन वाढणार आहे, तसेच शेतीमध्ये देखील सुधारणा होईल.
सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना परंपरेगत कृषी विकास योजनेंतर्गत आर्थिक अनुदान सेंद्रिय शेतीवर सबसिडी देखील दिले जाते, जेणेकरून लागवडीचा खर्च शेतकऱ्यांवर पडू नये आणि शेतकरी सुरक्षितपणे शेती करू शकतील. उपादान जरी कमी झाले तरी याचा शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, याबाबत हा निर्णय आहे.
Onion News: कांदा विक्रीप्रकरणी मोदी सरकारने उचलले मोठे पाऊल! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
यामध्ये आता शेतकऱ्यांना रसायनमुक्त सेंद्रिय शेती करण्यासाठी 3 वर्षांसाठी 50,000 रुपये अनुदान दिले जातात. या अनुदानाचे वाटप दोन हप्त्यांमध्ये केले जाते, ज्यामध्ये 31,000 रुपये पहिला हप्ता थेट बँक खात्यात जमा केले जातात, याचा सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना फायदा होतो. दुसरा हप्ता पुढील 2 वर्षात दिला जातो.
कास पठारावरील फुलांचा हंगाम 10 सप्टेंबरपासून सुरू, पर्यटक खुश
याचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे बंधनकारक आहेत. यामध्ये-आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, शिधापत्रिका, मोबाईल नंबर, आधारशी लिंक असणे आवश्यक, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे गरजेचे आहे. तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pgsindia-ncof.gov.in/ ला भेट देऊन अर्ज करू शकता.
महत्वाच्या बातम्या;
पतसंस्थाना सीबील लागू होणार? राज्य सरकारची मोदी सरकारकडे मागणी..
देशाचे आयटी हब संकटात! पावसाचा हाहाकार, घरात बाहेर सगळीकडे पाणी, हॉटेलमध्ये ४० हजार भाडे..
हमीभावाच्या कायद्यासाठी दिल्लीत देशातील शेतकरी मैदानात, राजू शेट्टी म्हणाले तिकीट बुक करा..
Share your comments