राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देणार असल्याचे सांगितले गेले होते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता सरकार बदलले असल्याने हे पैसे मिळणार की नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोर्चात सहभागी होण्याचे आव्हान त्यांनी केले आहे. शिवाय पूराची परस्थिती असेल तर पोहत या पण उपस्थित राहवा असे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ( Regular loans ) नियमित कर्ज रक्कम अदा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. असे असताना केवळ आश्वासन दिले गेले मात्र पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत.
अर्थसंकल्पामध्येही याची तरतूद करण्यात आली होती. आता सरकार बदलले तरी प्रोत्साहनपर रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली नाही. त्यामुळे सरकार हे शेतकऱ्यांना प्रोत्साहन नाही तर खच्चीकरण करीत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. यामुळे पूराची परस्थिती असेल तर पोहत या पण उपस्थित राहवा असे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांनो भातशेतीत सोडा मासे, आधुनिक तंत्रामुळे शेतकरी कमवत आहेत लाखो रुपये..
13 जुलै रोजी दसरा चौकातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी हे प्रोत्साहनपर रकमेपासून वंचित आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातूनच लढा उभारला जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.
काय सांगता! शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारी सुट्टी
याबाबत तुम्ही केवळ उपस्थिती दर्शवा पैसे वसुल केल्याशिवाय सरकारला न सोडण्याची जबाबदारी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची. शिवाय गट आणि तट विसरुन सहभागी रहावा. आता कुठे गट तट राहिले आहेत. राजकीय स्वार्थासाठी कोण कुणालाही मिठी मारीत असल्याचे देखील ते म्हणाले. यानंतर राज्यभर मोर्चे काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या;
राज्यात वाढतोय रेशील उद्योग, शेतकऱ्यांना 3 लाखांपेक्षा जास्तीचे अनुदान
जनधन खातेदारांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकार देणार 3 हजार रुपये
या गोष्टी कधीही चहासोबत खाऊ नका, आरोग्यासाठी आहे खूपच धोकादायक
Share your comments