सोलापूर- ड्रॅगन फ्रुट तसे पाहायला गेले तर वियतनाम,दिशा इत्यादी देशांमध्ये घेतले जाणारे फळ पीक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून ड्रॅगन फ्रुट ची लागवड भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्रातही याचे प्रमाण वाढत चालले आहे.
ड्रॅगन फ्रुट तसें निवडुंग जातीतील औषधी गुणांनी युक्त फळपीक आहे.ड्रॅगन फळ लागवडीला प्रोत्साहन मिळावे म्हणून 2021 –22 या वर्षापासून कृषी विभागाकडून एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी अनुदानाचे स्वरूप
ड्रॅगन फ्रुट लागवडीसाठी लागणारे साहित्य,ठिबक सिंचन, आधार पद्धत आणि खते व पीकसंरक्षणासाठी अनुदान देय आहे. या योजनेनुसार प्रतिहेक्टर चार लाख रुपये प्रकल्प व्हॅल्युएशन ग्राह्य धरून 40 टक्के याप्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान तीन वर्षात म्हणजेच पहिल्या वर्षी 60:20:20 या प्रमाणात विभागून देण्यात येते. परंतु यामध्ये अट आहे की दुसर्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के ड्रॅगन फ्रुट चे झाडेजिवंत असणे आवश्यक आहे. अशी माहिती सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
ड्रॅगन फ्रुट चे औषधी गुणधर्म
ड्रॅगन फ्रुट ला सुपर फ्रुटअसे देखील म्हणतात. सपना मध्ये असलेले पोषक तत्वे आणि अँटिऑक्सिडंट गुणांमुळेया काळात फार कमी वेळेत जास्त पसंती मिळत आहे.या फळांमध्ये कॅल्शियम,फॉस्फरस इत्यादी गुण जास्त असतात. ड्रॅगन फ्रुट वर रोग आणि किडींचा प्रादुर्भावअल्प प्रमाणात होतो. त्यामुळे साहजिकच पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही.( संदर्भ- सकाळ)
Share your comments