1. बातम्या

पीएम किसान योजना- 31 मार्च आहे शेवटची तारीख; सहा हजार रुपये हातचे जाऊ देऊ नका

KJ Maharashtra
KJ Maharashtra
मार्च अखेरपर्यंत करा पीएम किसान योजनेत नोंदणी

मार्च अखेरपर्यंत करा पीएम किसान योजनेत नोंदणी

जर तुम्ही शेतकरी असाल आणि केंद्र सरकारची महत्वकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत नोंदणी केली नसेल तर लवकर नोंदणी करून घ्या. कारण की, या योजनेसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2021 देण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत आठवा हप्ता 31 मार्च 2021 पूर्वी मिळण्यास सुरुवात होणार आहे. या योजनेद्वारे मिळणारा पैसा हा थेट बँक खात्यात जमा होत असतो. परंतु ज्या शेतकऱ्यांनी या योजनेत नाव नोंदणी केली आहे त्यांना या योजनेचा लाभ होतो. या योजनेअंतर्गत येणारा आठवा हप्ता होळीच्या आधी म्हणजे 31 मार्चपूर्वी तुमच्या खात्यात जमा होणार आहे.

 

या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही 31मार्च पर्यंत नोंदणी करून घेणे महत्त्वाचे आहे. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला आपले सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊ तुमच्या नावाची नोंदणी करता येऊ शकते. या सर्व शेतकरी आपले कागदपत्र गावातील तलाठी कार्यालयात जमा करूनही नाव नोंदणी करू शकते.

 

तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला की नाही ते कसे पाहायचे?

 तुम्ही पीएम किसान चे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisaan.gov.in/ या वर लॉग इन करून पैसे जमा झाले का नाही ते पाहू शकता.  सगळ्यात अगोदर तुम्ही या संकेतस्थळावर जाऊन फार्मर कॉर्नर मधील या पर्यायावर क्लिक करून तिथे तुमचा आधार नंबर नोंद करून किंवा मोबाईल नंबर नोंद करून गेट डाटा या वर क्लिक केले की तुम्हाला तुमच्या त्याविषयी सविस्तर माहिती मिळते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters