यंदाचा उन्हाळा हा गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत खूपच जास्त होता. यामुळे धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. यामुळे जूनमध्ये पाऊस पडला तर पाण्याचे संकट टळेल.
सध्या राज्यातील एकूण दोन हजार ९९३ प्रकल्पांमध्ये सुमारे ४३४.२७ टीएमसी एवढा म्हणजेच सरासरी ३०.५३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात एक टक्क्याने घट झाली असल्याची स्थिती आहे. यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे.
गेल्या वर्षी उशिराने पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील धरणांमध्ये चांगले पाणी आले होते. गेल्या वर्षी याच काळात राज्यातील प्रकल्पामध्ये अवघा ३१.६३ टक्के एवढा पाणीसाठा होता. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते.
शेतात काम करताना ट्रॅक्टर खाली सापडला शेतकरी, बारामतीत युवा शेतकऱ्याचे दुर्दैवी निधन..
सर्वाधिक पाणीटंचाई भासत असलेल्या औरंगाबाद विभागातील प्रकल्पामध्ये २९.६७ टक्के पाणीसाठा होता. राज्यात गेल्या दोन वर्षांपूर्वी पाण्याची मोठी टंचाई भासली होती. यामुळे याचा परिणाम झाला होता.
कांदा निर्यातीत मोठी वाढ, दरांकडे शेतकऱ्यांचे लक्ष...
त्यामुळे पाण्यासाठी शासनाला अनेक ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. सध्या गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.
सर्वाधिक एफआरपी थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये पहिले 2 कारखाने इंदापूरचे....
पूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बालाजी खैरे तर उपसभापतीपदी रुख्मीनबाई पिसाळ यांची निवड!
हिंगोलीत मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मोठा अपघात, 150 मेंढ्या आणि 5 जणांचा जागीच मृत्यू...
Share your comments