1. बातम्या

तुडतुडे कीड नियंत्रण आणण्यासाठी ३ लाख लिटर मेटारायझियम तयार होणार

किरण भेकणे
किरण भेकणे
farming

farming

आपत्कालीन समस्येवर मात करण्यासाठी क्रॉससॅप योजना अंतर्गत जैविक रसायनांचा १ हजार ५०० लिटर चा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती सांगितलेली आहे.जिल्हयामधील प्रत्येक गावात गट प्रतिनिधी, कृषीमित्र किंवा प्रगतशील शेतकऱ्यांसाठी १ लिटर मेटारायझियम तयार करण्यात आले आहे.

पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव:

जिल्ह्यामध्ये जवळपास ३ लाख लिटर मेटारायझियम तयार होणार आहे जे की हे मेटारायझीयम १० रुपये प्रति लिटर या  प्रमाणे स्थानिक शेतकरी(farmer) वर्गाला उपलब्ध करून देण्यात  येणार आहे अशी माहिती  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी   भाऊसाहेब बऱ्हाटे  यांनी दिलेली आहे.शेतकरी शेतात धान पिकाचे  मोठ्या  प्रमाणात उत्पन्न  व्हावे म्हणून  वारेमाप   रसायन  खतांचा वापर  करतात.  नत्रयुक्त असणारी  खते  वापरल्याने धान  पिकावर   मोठ्या  प्रमाणात मावा, तुडतुडा तसेच अनेक  रोगांचा  प्रादुर्भाव होतो.जेव्हा  शेतामध्ये  धान पीक गर्भावस्था  मध्ये असते त्यावेळी या  पिकावर किड व  रोग येत असल्यामुळे याचा परिणाम त्याच्या उत्पादनावर होतो. शेतकरी पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  वेगवेगळ्या   रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत असतात तरीही त्यावर नियंत्रण राहत नाही तसेच यामध्ये शेतकऱ्यांचा यामध्ये बऱ्याच प्रमाणात पैसा जातो.

हेही वाचा:राज्यात सोमवारी दूध दरासाठी आंदोलन होणार

यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांवर प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जैविक कीटकनाशक उपलब्ध करून देणार येणार आहेत. या तीन लाख मेटारायझीयममुळे ३० हजार एकर भात लागवड क्षेत्रावर तुडतुडा या किडीचे नियंत्रण होणार आहे, एवढेच नाही तर जैविक औषधांचा वापर करून निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे  वाटचाल सुद्धा  करणार आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब  बऱ्हाटे यांनी असे  सांगितले  आहे  की शेतकऱ्यांनी मेटारायझियमसाठी गावातील कृषी सहायक, कृषिमित्र यांच्याकडे नोंद करावी.

५७० लाख रुपयांची हाेणार बचत:-

प्रति एकर रासायनिक औषधांची फवारणी  करायची  असेल तर दोन हजार रुपये  खर्च येतो जे की याप्रमाणे धरले तर ३० हजार  एकर क्षेत्रावर रासायनिक औषधांचा वापर करून क्षेत्र नियंत्रण करायचे असेल तर त्यासाठी जवळपास ६०० लाख रुपये इतका खर्च शेतकऱ्यांना येईल.मेटारायझीयम चा वापर केल्याने शेतकऱ्यांना प्रति एकर ५ लिटर कीटक - नाशकाची  आवश्यकता  असते असे प्रकारे शेतकऱ्यांने  दोन वेळा फवारणी  केली  की तुडतुडे  कीड  पूर्णपणे नियंत्रणात येते. याप्रमाणे प्रति एकर शेतकऱ्यांना १०० रुपये खर्च येईल म्हणजेच ३० हजार एकर क्षेत्रावर कीड नियंत्रण करायची असेल असेल तर  तुम्हाला फक्त ३० लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे या उपक्रमांचा वापर करून जर तुम्ही रासायनिक औषध वापरली तर ५७० लाख  रुपये ची  शेतकऱ्यांची बचत होणार आहे.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters