शिराळा; सध्या राज्यात साखर कारखाने सुरू झाले असून उसाच्या दराची स्पर्धा सुरू झाली आहे. आता चिखली, ता. शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याकडून ऊसाला प्रतिटन रुपये 3 हजार वर्ग करण्यात आले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने 7 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. नोंदीनुसार तोडी देण्यात येत आहेत. तोडणी व वातुकीची यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. तसेच कोणाचा उस देखील शिल्लक राहणार नाही.
यामुळे शेतकर्यांची कोणत्याही तक्रार येणार नाही, अशा पध्दतीने तोडणी कार्यक्रम राबविला जात आहे. 2 डिसेंबर अखेर 1 लाख 63 हजार 670 टन ऊसाचे गापळ झाले आहे.
पारवडी येथे ऊस खोडवा पाचट कार्यक्रम संपन्न, शेतकऱ्यांना होणार फायदा
दरवर्षी शेतकर्यांनी पिकवलेल्या ऊसाला जास्तीत-जास्त दर देण्याचा संचालक मंडळाने प्रयत्न केला आहे. ऊस विकासासाठी विविध उपक्रम कारखान्यामार्फत राबिविले जात आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
चळवळीचे साक्षीदार ९० वर्षाचे बयाजींची आज साथ सुटली! राजू शेट्टी भावूक
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे शिक्षण व माहिती, ठिबक सिंचन अनुदान, पतीवर खते, बियाणे व औषधे शेतकर्यांना पुरविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता पाणीपट्टी थकवली की न्यायालयाची नोटीस, ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे धाबे दणाणले..
आता एसटीत द्या ऑनलाइन पैसे, सुट्या पैशांची कटकट मिटणार..
गुजरात कोणाच? विधानसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क
Share your comments