1. बातम्या

राज्यात २७. ३८ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यापैकी २० जुलैअखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुरक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ देण्याचे आश्वसन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे. त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवली जावी, जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

या योजनेसाठी २१ हजार ४६७ कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यापैकी १७ हजार ६४६ कोटी रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेतून देण्यात आला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात जवळजवळ १९ लाख खातेदारांना ११हजार ९९३ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला कप २०२०-२१ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एकूण ५६५३ कोटी रुपयांची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली आहे. यादीतील उर्वरि ५.५२ लाख खातेदारांनी प्रमाणिकरण केल्यानंतर त्यांना लाभ मिळेल. मार्च २०२० मध्ये काही जिल्ह्यात निवडणूक जाहीर झाल्यामुळे लागू झालेली आचारसंहिता व त्यानंतर कोविड-१९ महामारीमुळे काही ठिकाणी कर्जमुक्तीचा लाभ देणे शक्य झाले नव्हते. परंतु आता परत ही प्रक्रिया सुरु झाली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters