वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल मध्ये महाराष्ट्रातील 26 उद्योजिका सहभागी होणार

Tuesday, 23 October 2018 08:22 AM


नवी दिल्ली:
केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील 26 उद्योजिका सहभागी होणार आहेत. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी दिनांक 26 ऑक्टोबरला होणार आहे. देशभरातील 500 महिला उद्योजक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत.

सेंद्रीय शेती करणाऱ्या महिला शेतकरी व महिला उद्योजकांस प्रोत्साहन देण्यासाठी या मेळ्याचे आयोजन मागील चार वर्षांपासून करण्यात येत आहे. महिला उद्योजकांस योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांचे सक्षमीकरण व्हावे, महिला उद्योजकांसाठी अधिकाधिक संधीची दारे उघडावीत हा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे.

महाराष्ट्रामधून नंदुरबार (4), जळगाव (4), नागपूर (2), भंडारा (1), अमरावती (2), यवतमाळ (4), औरंगाबाद (1), हिंगोली (1), बीड (1),  तर मुंबईतून 4 उद्योजिका सहभागी होणार आहेत. यासह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॅनिक फार्मर्स यांचाही सहभाग असणार आहे.

महाराष्ट्रामधून येणाऱ्या महिला उद्योजक प्रदर्शनामध्ये  डाळी, हळद, मसाले, औषधीयुक्त काळे तांदूळ, पारपरिक तांदूळ, तेलबिया, केळीचे चिप्स, लोणची, नागलीचे विविध खाद्य पदार्थ, चिक्की, बेसनाचे लाडू, अंबाडी, फुले, गवती चहा, तरोटा कॉफी, बेबी बॉडी वॉश, बॉडी क्रिम, लीप बाम, मालिश तेल, हॅन्डवॉश, असे विविध वस्तू तसेच पदार्थ येथे विक्रीसाठी प्रदर्शित केले जाणार आहेत. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

Women of India Organic Festival वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल organic सेंद्रिय
English Summary: 26 entrepreneurs from Maharashtra will participate in the Women of India Organic Festival

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.