सध्या श्रावण महिना सुरु होणार आहे. यामुळे या महिन्यात शक्यतो अनेकजण मांसाहार करणे टाळतात. यामुळे हा महिना सुरु होण्याच्या आधी अनेक ठिकाणी मोठ्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. यामुळे यादिवशी मोठ्या प्रमाणावर मांस विक्री होत असते. अनेकजण गुरुवारी मांसाहार (Non veg ) करणं टाळतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागात बुधवारी गटारी साजरी झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर मांस फस्त करण्यात आले.
पुणे, पिंपरी चिंचवडमधील खवय्यांनी तब्बल दोन हजारपेक्षा जास्त बोकड फस्त केलेत. तर चिकनची 700 टन इतकी मोठी विक्री झाली. तसेच 40 ते 50 टन मासळी पुणे, पिंपरीत फस्त करत गटारी जोरात साजरी करण्यात आली. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे. याचे दर देखील दोन दिवसात वाढले आहे. मात्र तरी देखील याला अनेकांनी पसंती दिली आहे.
दीप अमावस्या गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. गुरुवारी रात्री दीप अमावस्या संपते. गुरुवारी मासांहार करणं बहुतांश लोकं टाळत असल्याने अनेकांनी बुधवारीच म्हणजे एक दिवस आधीच गटारी साजरी केली. अडीच हजार बकऱ्यांची आवक पुणे, पिंपरीमधील बाजारत अमावस्येनिमित्त झाली होती. चिकनला लोकांनी प्रचंड मागणी होती. जवळपास 800 टन चिकनची विक्री पुण्यात झाली असल्याची माहिती पुणे बॉयलर असोसिएशनच्या संचालकांनी दिली आहे.
सहकार मंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा...
दरम्यान, मागणी लक्षात घेता आधीच 10 ते 12 टन खोल समुद्रातील मासे, कतला, सीलन मासळीची 20 टन आंध्रमधून आयात, तसंच खाडी आणि नदीतील मासळीची प्रत्येकी 700 किलो आणि 500 किलो अशी आवक झाली होती. मटण 680 ते 700 रुपये किलो दराने बुधवारी विकले जात होते. तर चिकनची किंमत 200 रुपये किलो होती. पापलेट 800 ते दोन हजार रुपये तर हलवा 700 ते एक हजार रुपये किलो दर इतक्या विक्रमी दराने विकला जात होता.
गेल्या वर्षी ऊस तोडताना नाकीनऊ आले, तरीही ऊस लागवडीत यंदा 7 टक्क्यांची वाढ
यामुळे अनेकांनी गटारी जोरात साजरी केली. तसेच याच्या जोडीला अनेकांनी दारू देखील घेतली. दारूची देखील मोठी विक्री यामुळे शहरात झाली. यामुळे मांस दारू विक्रेत्यांची चांगलीच चंगळ झाली. शहरात अनेक ठिकाणी याच्या खरेदीसाठी अनेकांनी रांगा लावल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या;
बोंडअळी कायमची मिटणार, कापूस संशोधन संस्थेने घेतला मोठा निर्णय..
ऑस्ट्रेलिया, ब्राझीलमध्ये जसा उतारा तसा उसाला दर, मग भारतात का होतोय शेतकऱ्यांवर अन्याय? वाचा खरी परिस्थिती
ब्रेकिंग! राज्यात सत्ता संघर्ष सुरु असताना राज्यातील 10 राजकीय पक्षांची मान्यता रद्द, अनेकांना धक्का..
Share your comments