यावर्षी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये कांद्याचे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. कधी नव्हे मेथी लागवड खानदेश पट्ट्यातदेखील झाली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर नाशिक जिल्ह्याला कांद्याचे आगार देखील म्हटले जाते.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा,येवला, चांदवड, सिन्नर, निफाड आणि मालेगाव तालुक्यांमध्ये उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जर यावर्षी उन्हाळी कांदा लागवडीचा विचार केला तर यामध्ये लागवड क्षेत्रात तब्बल 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.जर उन्हाळी कांद्याच्या सर्वसाधारण क्षेत्राचा नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर ते एक लाख 70 हजार हेक्टर असून या वर्षी तब्बल दोन लाख 11 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. जर कांदा लागवडीचा प्रकारानुसार विचार केला तर खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी मिळून तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर राज्याच्या एकूण कांदा उत्पादनाचा विचार केला तर 15 ते 20 टक्के उत्पादन एकट्या नाशिक जिल्ह्यात होते.
तसेच महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाच्या कांदा बाजारपेठ देखील नाशिक जिल्ह्यात आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील कांदा आवक यावरून राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील कांद्याचे भाव ठरत असतात. यावर्षी उन्हाळ कांद्याच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा विचार केला तर या तालुक्यांमध्ये ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती परंतु सद्यस्थितीत ऊस लागवड क्षेत्रात घट होऊन या तालुक्यात देखील कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. जर मागच्या वर्षीचा विचार केला तर उन्हाळी कांद्याचेबियाण्याचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवला होता.
त्यामुळे जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे एक लाख हेक्टरच्या आसपास लागवड झाली होती. परंतु या वर्षी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने कांदा पिकाला शेतकऱ्यांचे प्राधान्य दिले असून उन्हाळी कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. तब्बल 2 लाख 11 हजार 762 हेक्टर उन्हाळ कांदा लागवड नाशिक जिल्ह्यात झाली आहे.
Share your comments