भारतातील 60 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या शेतीवर अवलंबून आहे. शेतीमध्ये अनेक प्रकारची पिके घेतली जातात. पिकातून दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी व रोगांना अटकाव करण्यासाठी अनेक प्रकारची कीटकनाशके बुरशीनाशके कवकनाशके पिकांना फवारावी लागतात. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेचा खूप मोठा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे पिकांना विविध प्रकारची कीटकनाशके शेतकऱ्यांना फवारावी लागत आहे. पण मात्र आता कीटकनाशकेच बोगस निघताना दिसत आहेत, आणि त्यामुळे पिकातून दर्जेदार उत्पादन मिळणे ऐवजी पिकाची नासाडी होताना दिसत आहे. यंदा मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका फळबाग पिकांना बसला. या फळबाग पिकांना शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारणी करून कसेबसे जगवले आहे. नगर मध्ये देखील मध्यंतरी झालेल्या अवकाळी व त्यानंतर बदललेल्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम फळबाग पिकांवर बघायला मिळाला, विशेषता हवामान बदलाचा डाळिंबाच्या बागांना मोठा फटका बसला, यामुळे डाळिंब बागांवर किडिंचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव बघायला मिळाला.
डाळिंब बागा वर आलेला या किडीचा नायनाट व्हावा व डाळिंबाला चांगली चकाकी यावी व त्यातून दर्जेदार उत्पादन मिळावे या आशेने नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने डाळिंबावर एका बुरशीनाशकाची फवारणी केली, मात्र हे बुरशीनाशक बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शेतकऱ्यांनी ज्या बुरशीनाशकाची डाळिंबाच्या बागावर फवारणी केली त्या बुरशीनाशकाची कंपनीच अस्तित्वात नसल्याचा खुलासा यात झाला आहे, बोगस बुरशीनाशकांची फवारणी केल्यामुळे या शेतकऱ्याला तब्बल 25 लाखांचा गंडा लागला आहे. या प्रकरणातून इतर शेतकऱ्यांना शिकवण घेण्याची गरज आहे व कुठलेही कीटकनाशक विकत घेताना दक्षता बाळगणे जरूरी ठरले आहे, नाहीतर या कीटकनाशकांमुळे पिकांचं तर नुकसान हे अटळ आहे, तसेच यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्याला सुद्धा हानी पोहचू शकते शिवाय कीटकनाशकासाठी झालेला खर्च हा देखील वाया जाणार आहे.
नेमके काय आहे हे प्रकरण
या प्रकरणात अधिक माहिती अशी समोर आली आहे की, नगर जिल्ह्यातील गावडेवाडी गावात प्रकाश व विनोद गावडे यांच्या डाळिंबाच्या बागा आहेत. या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या बागावर अवकाळी व त्यानंतर झालेल्या हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम बघायला मिळत आहे, डाळिंबाच्या बागावर मोठ्या प्रमाणात किडिंचा हल्ला झाला असल्याने या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबाचे नुकसान होऊ नये व त्यातून चांगले दर्जेदार उत्पादन घेता यावे तसेच डाळिंबाला चांगली चकाकी यावी या उद्देशाने बुरशीनाशकाची फवारणी केली, मात्र फवारणी करून अवघ्या काही दिवसांचा कालावधी उलटला आणि डाळिंबाच्या बागेत फळगळ बघायला मिळाली. फळगळ एवढी प्रचंड प्रमाणात होती की त्यामुळे त्यांना तब्बल पंचवीस लाखांचा फटका बसला आहे. प्रकाश व विनोद तावडे यांनी यासंदर्भात कृषी विभागात तक्रार दिली आहे. त्यांनी जेथून औषधे खरेदी केली होती तेथे छापेमारी झाली असता, बुरशीनाशकाची कंपनी अस्तित्वातच नाही असा धक्कादायक खुलासा या वेळेस झाला.
- शेतकरी मित्रांनो हेही अवश्य वाचा:- पिक विमामध्ये झाला आहे घोटाळा! माजी मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप
आता प्रश्न असा बनावटी कीटकनाशके ओळखायची कशी
जर औषध विक्रेता आपणास कीटकनाशक त्यावर असलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीत देत असेल, तर कीटकनाशक बोगस असण्याची शक्यता अधिक असते. ज्या कंपनीची कीटकनाशके प्रचलित असतात त्याच कंपनीच्या नावाने बोगस कीटकनाशके बाजारात विक्री केली जातात, त्यामुळे कीटकनाशक खरेदी करताना त्यावर असलेली एक्सपायरी डेट बघूनच खरेदी करणे आवश्यक ठरते, तसेच कीटकनाशक वर दिलेल्या इतर बाबींची खात्री करणे देखील महत्त्वाचे ठरते. यासाठी आपण कृषी वैज्ञानिकांचा सल्ला घेऊ शकता अथवा कुणी अनुभवी शेतकऱ्यांचा सल्ला या कामी महत्त्वाचा ठरू शकतो.
तसे बघायला गेले तर भारतात कुठलेही कीटकनाशक हे तपासणी नंतरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध व्हावेत असाच नियम आहे, मात्र, असे असले तरी बाजारात असे अनेक कीटकनाशके उपलब्ध आहेत जे विना तपासणी शेतकर्यांच्या माथी लादली जात आहेत आणि याबदल्यात अवाजवी रक्कम देखील वसूल केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शिवाय पिकांचे देखील यामुळे नुकसान होत आहे तसेच तपासणी न झाल्याकारणाने यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो.
•हेही वाचा:- Wheat Crop: शेतकरी मित्रांनो गव्हावरील तांबेरा रोगाचे असे करा व्यवस्थापन, रोग येईल नियंत्रणात आणि होईल उत्पादनात वाढ
Share your comments