1. बातम्या

श्री श्री स्वदेशी बियाणे महोत्सवात 2000 शेतकऱ्यांचा सहभाग

KJ Staff
KJ Staff


बेंगलुरु:
आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगलुरु येथील प्राचीन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या “स्वदेशी बियाणे महोत्सवात” भारतातल्या 8 राज्यातुन आलेल्या 2000 पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी भाग घेतला. देशी बियाण्यांचे प्रकार तसेच देशी बियाणे वाढवण्याचा व्यवसाय हा कसा फायदेशीर ठरू शकतो, ह्यासंबधीची माहिती देवाणघेवाण करण्याकरिता, एकाच मंचावर सर्वजण एकत्रित होऊन संकरीत बियाण्यांच्या एकाधिकारावर मात करण्याकरिता शेतकऱ्यांनी ह्या महोत्सवात भाग घेतला.

ह्या प्रसंगी, आर्ट ऑफ लिविंग इंटरनॅशनल सेंटरचे संस्थापक तसेच जागतिक अध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर ह्यानी स्वदेशी बियाणे महोत्सवाच्या प्रदर्शनिला आपले आशिर्वाद दिलेत. ह्या प्रसंगी इतर मान्यवर शेतकरी जसे श्री भीम सिंग, ज्याना माननीय प्रधान मंत्री श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते कृषी उन्नती अवार्ड प्राप्त झाला, श्रीमती रहिबाई सोमा पोपेरे 2018 मधील शंभर स्त्रिया ह्या बीबीसीच्या यादीत समाविष्ट असलेले नाव, ज्याना सीड मदर नावाने पण ओळखले जाते. श्रीमती पोपेरे ह्यानी स्वयं बचत गटातील बऱ्याच शेतकऱ्यांना पिकांच्या मूळ जातीकडे वळण्यास मदत केली असे नामांकित शेतकरी उपस्थित होते. 

ह्या प्रसंगी श्री रवि शंकर म्हणालेत, आम्ही शेतकऱ्यांना स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याकरिता मदत करीत आहोत. कृषी हा मानवीय अस्तित्वाचा कणा आहे. कोणत्याही संस्कृतीच्या समृद्धीसाठी कृषी निरोगी आणि टिकाऊ असणे आवश्यक आहे. स्वदेशी बियाणे महोत्सवात भाग घेण्याकरिता आलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी स्वागत करताना श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजीचे अध्यक्ष श्री. राम कृष्णा रेड्डी म्हणालेत, आम्ही हा बियाणे महोत्सव बियाण्यांची देवाणघेवाण आणि त्यासंबधीची माहिती देवाणघेवाण करण्याकरिता विशेषतः शेतकऱ्यांसाठी आयोजित केला.

सध्याच्या परिस्थीत शेतकऱ्यांना प्रत्येक वेळेला पेरणी करत असताना बियाणे खरेदी करण्याकरिता पैसे मोजावे लागतात (ज्यात अधिकतर संकरीत बियाणे असतात) शेतकऱ्यांना ह्या चक्रातून मुक्त करण्याकरिता स्वदेशी बियाणे वापरण्याच्या पारंपरिक पद्धतीकडे वळण्यासाठी आम्ही प्रस्ताव देत आहोत. जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी त्याना प्रोत्साहन देण्याकरिता स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन करून आपसात व्यापार करण्याकरिता आम्ही त्याना प्रशिक्षण देत आहोत. स्वदेशी गाईचे तसेच स्वदेशी बियाण्यांचे संवर्धन करून त्यांचे संरक्षण करणे आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्यांला आनंदी, सुखी आणि समृद्ध करणे हे गुरुदेव श्री श्री रवि शंकर ह्यांचे लक्ष आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता आणि खरीप हंगामात स्वदेशी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याकरिता श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजी तर्फे हा स्वदेशी बियाणे महोत्सव आयोजित करण्यात आला.


श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ एग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजीचे सीईओ श्री. एस. आर. व्यंकटेश म्हणालेत, स्वदेशी बियाणे हे स्थानिक कृषीविषयक परिस्थितीना चांगले अनुकूल असतात कीड, रोग आणि दुष्काळाचे प्रतिकारक मदत करणारे असतात. शेतकरी हाच बियाण्यांचा योग्य मालक आहे, तो बियाण्यांचा संरक्षक आहे. शेतकऱ्यांना पुरवठा साखळीत सक्रिय सहभाग करून घेण्यातच शेतकऱ्यांचे खरोखरचे सशक्तीकरण आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगने भारतातील 22 राज्यांमधील नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये 2.2 दशलक्ष शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे, जे हवामान प्रतिरोधक असून बहु-पीक वापरतात, म्हणून शेतकरी अद्यापही कमी पाऊस असूनही नफा कमावू शकतात आणि आर्थिक आणि भौतिक परस्पर तडजोड न करता प्रतिस्पर्धी उत्पन्न मिळवू शकतात. शेतकऱ्याचे आरोग्य नैसर्गिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी देसी बियाणे आवश्यक आहे. सध्या, स्वदेशी बिया मिळविण्यासाठी फार कमी विश्वासार्ह स्त्रोत आहेत.

श्री श्री इन्स्टिट्यूट ऑफ अग्रिकल्चरल साइन्स अँड टेक्नालजीचे माजी विश्वस्त, डॉक्टर प्रभाकर राव  म्हणालेत, ह्याचे कारण म्हणजे, हायब्रीड बियाण्यांप्रमाणे जे, काही मोठ्या कंपन्यांचे एकाधिकार आहेत, देशी बियाणे कोणालाही उगवता येतात आणि वाढवता येतात आणि उत्पादकांना काहीही मिळत नाही. आर्ट ऑफ लिविंग, देशी बियाणे व्यवहार, व्यावसायिक मॉडेलमध्ये जाणून घेण्यासाठी, लीड्स विद्यापीठ, म्यूनिखच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी, जर्मनी आणि हेलरुम बीड, ब्रीडर असोसिएशन यासारख्या काही विद्यापीठांसह रॉयल्टी मॉडेल विकसित करून शेतकऱ्यांना मदत करीत आहे. ह्या बियाणे महोत्सवात खालील माहितीची देवाणघेवाण करण्यात आली.

  • एक एकर जमिनीसाठी 2.5 किलो बियाणे वापरत असलेल्या भातशेतीची पद्धत दर्शविणे.
  • 50 सें.मी.- 50 सेंमी: पेरुमल पद्धती ज्यात प्रत्येक एकर ला 250 ग्रॅम बिया वापरल्या जातात.
  • बिजामृत तयार करणे: बियाणीच्या प्रक्रियेद्वारे 90 टक्के बियाणे उगवणे सुनिश्चित करणे.
  • पिकांची दिनदर्शिका.
  • स्वदेशी पद्धतींद्वारे देशी बियाणे नैसर्गिकरित्या संरक्षित कसे करावे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters