राज्यात सरासरीपेक्षा २० अधिक पाऊस; पण दहा जिल्ह्यात अजून प्रतिक्षा

29 June 2020 07:54 PM By: भरत भास्कर जाधव


देशभरात पावसाची चांगली सुरुवात झाली, पण राज्यातील दहा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे तेथील नागरिक अजून चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत.  दरम्यान १४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तर ५ जिल्ह्यात सरासरीच्या ६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. राज्यात ११ जूनपासून पाऊस सक्रिय झाला आहे, त्यानंतर तीन दिवसातच पूर्ण राज्य व्यापला मात्र संपूर्ण राज्यात त्याचे प्रमाण विषम आहेत. दरम्यान मराठवाड्यात यंदा चांगला पाऊस झाला. फक्त नांदेडचा अपवाद वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. उत्तर कोकणच्या काही भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यात यंदा २८ जूनपर्यंत पावसाने उच्चांक नोंदविला आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस  झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान राजधानी दिल्लीत वादळ येत आहे. हवामान विभागाच्या मते पुढील दोन तासात दिल्लीतील वातावरण बदलणार असून जोरदार वारे वाहणार आहेत. चरखी दादरी, बावल, बरसाना, देग, करनाल, शामली, मुझफ्फरगनगर, डेरामंडीच्या आसपासच्या परिसरात २० ते ४० किमी प्रति तास या वेगाने वारे वाहणार आहे. तर पुर्वेकडील राज्यात पावसाने कहर केला आहे. आसाममध्ये अजून मुसळधार पाऊस चालू आहे. यामुळे तेथील २३ जिल्ह्यांमध्ये प्रभावित झाले आहेत. दरम्यान  रविवारीच्या सकाळपर्यंत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार, तर कोकण विदर्भात तुरळक ठिकाणी पावासाने हजेरी लावली आहे.  या पावसामुळे नद्या, नाले वाहू लागले असून धरणसाठ्यातही वाढ होत आहे. मराठावाड्यातील आठही जिल्ह्यातील जवळपास सर्व भागात हलका ते जोरदार पाऊस. जालना जिल्ह्यातील तीन व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. औरंगाबाद, जालना, जिल्ह्याच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. 

average rainfall rainfall Monsoon rain मॉन्सून पाऊस सरासरी पाऊस पावसाळा
English Summary: 20 more than average rainfall in the state, but still waiting in ten districts

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.