शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला असून यामध्ये एकही महिलेला संधी देण्यात आली नाही, यामुळे सरकारवर टीका केली जात होती. असे असताना आता लवकरच मंत्रिमंडळात महिलेला संधी देण्यात येणार आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) महिलांना स्थान मिळणार आहे. एक कॅबिनेट तर दुसरं राज्यमंत्रीपद महिलांना दिले जाणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्या 18 आमदारांनी शपथ घेतली. यामध्ये कोणत्याही महिला नेत्याचा समावेश केला गेला नाही. प्रचंड टीकेला सामोरं गेल्यानंतर अखेर आता महिलांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे यामध्ये कोणाची वर्णी आता लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामध्ये नाशिकच्या देवयानी फरांदे, तर पुण्याच्या माधुरी मिसाळ या दोन नावांची जोरदार चर्चा आहे. तसेच मनिषा चौधरी आणि सीमा हिरे या दोघींचीही नावं चर्चेत आहेत. मनिषा हिरे या नाशिकच्या आहेत. शिंदे गटातील एकही महिला नेत्याचे नाव चर्चेत नाही. यामुळे आता मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारची राज्यपाल नियुक्त १२ नावांची यादी समोर, वाचा कोणाची लागणार वर्णी?
सध्या मंत्रिमंडळ खातेवाटप देखील झाले असून भाजपकडे चांगली खाती देण्यात आली आहेत. शिंदे गटाकडे कमी महत्वाची खाती देण्यात आली आहेत, असेही म्हटले जाते. दरम्यान केंद्रात देखील फेरबदल केले जाणार आहेत, यामध्ये शिंदे गटाला दोन केंद्रीय मंत्रीपदे दिली जाणार आहेत. आता यामध्ये देखील कोणत्या खासदारांची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शिंदे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! 50 हजार, पूरग्रस्तांना मदतीसह केल्या अनेक घोषणा
मोठी बातमी! आता 'या' वाहनांमध्ये CNG आणि LPG किट लावा, केंद्राने दिली परवानगी..
'शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली'
Share your comments