1. बातम्या

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यात २ हजार १९२ कोटींचा निधी वितरित

KJ Maharashtra
KJ Maharashtra
अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत

महाराष्ट्रामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी त्यामुळे बसलेल्या पुराच्या फटक्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

या नुकसानभरपाई पोटी सरकारने शेतकऱ्यांना मदत म्हणून  २ हजार १९२ कोटी ८९ लाख ५हजार रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

   मागील वर्षाच्या (२०२०) मधील जून आणि ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाई नुसार पहिल्या टप्प्यातली मदत २ हजार २९७ कोटी ६ लाख रुपये ही नोव्हेंबरमध्येच वितरीत करण्यात आली होती. आता दुसरा टप्प्यातील निधी वितरित करण्यात आला आहे. जून आणि ऑक्टोबर या कालावधीत राज्यात अतिवृष्टीमुळे बहुसंख्य पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते.

 

अशा नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान यासाठी रुपये १० हजार प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसान भरपाईपोटी २५ हजार प्रती हेक्टर अशी मदत २ हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवून जाहीर करण्यात आली होती. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्या असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters