1. बातम्या

विदर्भातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
केंद्र सरकारने लॉकडाऊन संदर्भात जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार शेती आणि पूरक कामांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीविषयक सर्व कामे मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याचे थेट हस्तांतरण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या खात्यात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.

पी.एम. किसान योजना छोट्या आणि गरीब शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात येणाऱ्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन त्यानुसार पिकांच्या उत्तम वाढीसाठी तसेच योग्य उत्पादनासाठी आर्थिक मदत देते. या योजनेद्वारे प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात एका वर्षाला 2000 हजार रुपयांचे तीन हप्तेअसे एकूण सहा हजार रुपये थेट हस्तांतरित केले जातात.

केंद्र सरकारने आतापर्यंत 7.47 कोटी छोट्या आणि गरीब  शेतकऱ्यांच्या खात्यात 14,946 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात आपल्या खात्यातही नुकताच 2000 रुपयांचा पहिला हप्ता जमा करण्यात आल्याचे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट गावच्या गरीब शेतकऱ्याने सांगितले.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters