1. बातम्या

मतदारांसाठी 1950 क्रमांकाची हेल्पलाइन

मुंबई: लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत 15 मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने 1950 ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या हेल्पलाइन अंतर्गत 15 मदत केंद्रे कार्यरत असून त्यामुळे मतदारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होत आहे. आचारसंहिता लागल्याच्या कालावधीपासून या हेल्पलाइनवर दररोज विचारणा केली जात आहे. कॉल येत आहेत. याद्वारे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी सर्वाधिक मार्गदर्शन विचारण्यात आले आहे. 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाइन सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात आली आहे. याद्वारे मतदारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाते.

हेल्पलाइनची वैशिष्ट्ये:

  • नागरिकांना निवडणूक आणि मतदानासंबंधीची माहिती वेळोवेळी देणे.
  • नवीन मतदार नोंदणीसोबतच मतदारांच्या विविध शंकांबाबत मार्गदर्शन.
  • मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास मतदान यादीत नाव नोंदवायचे असल्यास काय करावे याबाबतही मार्गदर्शन.
  • मतदान ओळखपत्र व मतदान अर्जाशी निगडित सर्व माहिती उपलब्ध.
  • मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषांमधून माहिती.
  • निवडणूक संदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदविता येईल.
  • राज्यस्तरावर राज्य संपर्क केंद्र (State Contact Center)तसेच जिल्हास्तरावर जिल्हा संपर्क केंद्र (District Contact Centre) स्थापन.

या हेल्पलाइनच्या सहाय्याने मतदार नोंदणीसाठी संबंधितांना अधिकृत माहिती मिळविणे सोपे झाले आहे. मतदार यादीतील त्यांच्या वैयक्तिक माहितीचे तपशील, मतदान केंद्र, बूथ लेव्हल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती मतदार हेल्पलाइन मोबाइल एप किंवा www.nvsp.in पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनवर करून मिळविता येत आहे.

1950 या हेल्पलाईनवर पुढीलप्रमाणे माहिती मिळविता येते.

  • ECI <EPIC Number> <0 (इंग्रजीमध्ये उत्तरासाठी) किंवा (प्रादेशिक भाषेत उत्तरासाठी) <1.
  • ECIPS <EPIC NUMBER> असे केल्यास EPIC नंबर मतदाराला मतदान केंद्राचा पत्ता मिळेल.
  • ECICONTACT <EPIC NUMBER> हे मतदारांना बूथ लेव्हल ऑफिसर्स, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संपर्क तपशीलांसह उत्तर देतील.

 

English Summary: 1950 helpline for the voters Published on: 22 March 2019, 10:50 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters