सध्या राज्यात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे अनेकांची मोठी तारांबळ उडत आहे. पुण्यात तर मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने १४० वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. केवळ दोन तासांत तब्बल 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 1882 नंतर शहरात पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला आहे. याबाबत माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
हा पाऊस अवघ्या दोन तासांत झाल्याने ही अतिवृष्टी असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पावसाने शहरात 57 ठिकाणी पाणी घुसण्याच्या घटना घडल्या. यामुळे मोठी पळापळ झाली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे 50 हून अधिक तक्रारी आल्या होत्या. त्यात, 18 ठिकाणी घरांमध्ये, तर उर्वरीत ठिकाणी इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी घुसले होते.
कोंढवा खुर्द भाजी मंडई येथील एका घरात 7 जण अडकले होते. या सर्वांना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. अनेकांच्या गाड्या देखील वाहून गेल्या होत्या. यामुळे मोठे नुकसान झाले. या पावसाचा फटका रेल्वे विभागाला देखील बसला आहे. पुणे रेल्वे स्थानकात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
म्हशीची ही जात 700 ते 1200 लिटर दूध देते, दूध उत्पादकांना मिळणार बंपर कमाई
दिवाळी सुटीनिमित्त नागरिकांनी गावाकडे जाण्यासाठी गर्दी केली होती. पण अचानक आलेल्या पावसाने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे अनेकजण अडकून पडल्याचे दिसून आले. शहरात दोन ठिकाणी घरांच्या भिंत पडल्याची घटना घडली आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभाग व पालिका प्रशासनाकडून सुरु आहे.
बंगालच्या उपसागरात धडकणार चक्री वादळ, प्रादेशिक हवामान केंद्राची माहिती
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. बारामतीत कऱ्हा नदीला पूर आला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. यामुळे प्रशासन लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
राज्यातील दोन खासदारांचे तडकाफडकी राजीनामे, रेल्वेच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने निर्णय
उद्घाटनासाठी गेले आणि लिलावच पुकारला, शेतकऱ्यांसमोर छगन भुजबळ यांचा वेगळा अंदाज
कृषी विकास परिषद 2022: सेंच्युरियन वर्ल्ड स्कूल येथे कृषी विकास परिषद
Share your comments