केंद्र सरकारने केलेल्या किसान रेल्वेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. राज्यातील शेतकरी आपला शेतमाल परराज्यात विकू शकत आहेत. आता तर किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत असल्याने शेततकरी अधिक आनंदी आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांना लाभदायक ठरलेल्या किसान रेल्वेतून प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या डाळिंबाची उत्तर महाराष्ट्रातून वाहतूक करण्यात आली आहे. आतापर्यंत किसान रेल्वेच्या माध्यातून एका महिन्यात ११०० टनापेक्षा जास्त वाहतूक झाली आहे.
महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. उत्पादित होणार माल हा किसान रेल्वेच्या माध्यमातून थेट परराज्यात कमी वेळात आणि कमी खर्चात विकला जात आहे. यामुळे डाळिंब उत्पादकांना उडाण घेण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान राष्ट्रीय बागायती मंडळाच्या मते, डाळिंबाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ६२.९१ टक्के आहे. रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वे मुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत आहे आणि ताजी वस्तू कमी वेळात बाजारात जात असल्याने, फळांची मागणीत वाढ होत आहे व त्याचा फायदा शेतक-यांना होत असल्याबद्दल अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक सशोधन संघ, पुणे यांच्या पदाधिका-यांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा माल परराज्यातील मार्केटमध्ये विकला जातो. यासाठी होणारी वाहतूक ही स्वस्त आणि वेगवान असल्याने किसान रेल्वेचा लाभ घेणारे शेतकरी उत्सुक व आनंदी आहेत. किसान रेल्वे महाराष्ट्रातील शेतक-यांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. नाशवंत माल जसे डाळींब, शिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक महाराष्ट्रातील सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड, नाशिक, मनमाड या भागांतून केली जात आहे. आतापर्यंत किसान रेल्वेने वाहून नेलेल्या एकूण नाशवंत मालापैकी ११२७.६७ टन डाळिंबची वाहतूक केली आहे. ज्याचे प्रमाण एकूण नाशवंत मालाच्या सुमारे ६१ टक्के आहे.
हे पण वाचा : संत्रा उत्पादकांसाठी खूशखबर; राज्यातील संत्रा जाणार बांगलादेशाला
रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेमुळे वाहतुकीच्या इतर पद्धतींच्या तुलनेत वेळ कमी लागत आहे आणि ताजी वस्तू कमी वेळात बाजारात जात असल्याने, फळांची मागणीत वाढ होत आहे व त्याचा फायदा शेतक-यांना होत असल्याबद्दल अखिल महाराष्ट्र डाळींब उत्पादक सशोधन संघ, पुणे यांच्या पदाधिका-यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान किसान रेल्वे ७ ऑगस्ट २०२० रोजी देवळाली ते दानापूर पर्यंतची साप्ताहिक सेवा म्हणून सुरू झाली. त्यानंतर मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यानंतर सांगोला / पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडली जात आहे. आता किसान रेल्वे त्रि-साप्ताहिक म्हणून चालू आहे, याला शेतक-यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Share your comments