1. बातम्या

संत्रा उत्पादकांसाठी खूशखबर; राज्यातील संत्रा जाणार बांगलादेशाला

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


राज्यातून सुरु करण्यात आलेली किसान रेल्वे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. ज्यातील शेतकरी आपला शेतमाल परराज्यात विकू शकत आहेत. आता तर किसान रेल्वे आठवड्यातून तीनदा चालविण्यात येत असल्याने शेततकरी अधिक आनंदी आहेत. दरम्यान एका महिन्यात किसान रेल्वेतून ११२७.६७ टन डाळिंबची वाहतूक झाली आता संत्राही परराज्यात विक्रीसाठी जाणार आहे.
यादरम्यान पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी किसान रेल्वे अमरावतीवरुन सुरू करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहे लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

पश्चिम विदर्भ विकास परिषदेच्यावतीने शुक्रवारी सांयकाळी ‘जनतेशी संवाद’ कार्यक्रम आभासी स्वरूपात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी किसान रेल्वे सुरू करण्याची केलेली मागणी अतिशय योग्य असून नागपुरात शनिवारी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. चर्चा झाल्यानंतर अंतिम निर्णय होईल. शेतकरी, व्यापारी संघटना व उपलब्ध बाजारपेठ यांची सांगड घालून किसान रेल्वेचा उद्देश यशस्वी करण्यात येईल. पश्चिम विदर्भाच्या विकासात शेतीयोग्य पाण्याची उपलब्धता महत्वाची आहे. त्यासाठी सर्वांनी कार्य करण्याची आवश्यकता आहे. युवकांनी पारंपरिक शेती बरोबरच बदलत्या काळात पीक पद्धतीतही बदल करावा.

विदर्भातल्या संत्र्याला विविध कंपन्यांकडे व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचविणे शक्य आहे. त्यातून संत्र्याला उत्तम भाव मिळेल. सीताफळाला देशभरात प्रचंड मागणी असून ते वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावा. दरम्यान आता राज्यातील प्रसिद्ध संत्रा देखील किसान रेल्वेच्या माध्यमातून परराज्यात जाणार आहे. पण थेट रेल्वेची सुविधा नसल्याने रस्त्याने संत्र्यांची मालवाहतूक होते. विदर्भातून बांगलादेशपर्यंत रस्त्याने मालवाहतूक करताना साधारणत: ७२ तास लागतात. जर किसान रेल्वे सुरु झाल्यास ३६ तासात शेतकऱ्यांचा माल बांगलादेशच्या बाजारात उपलब्ध होवू शकेल. तसेच निर्यातीच्या खर्चामध्ये कपात होईल आणि त्यामुळे मालाची गुणवत्ता चांगली राहील. रेल्वे विभागाने नितीन गडकरी यांच्या या प्रस्तवाला हिरवा कंदील दाखविला असून लवकरच याचा रोडमॅप तयार करण्यात येईल.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters