मुसळधार पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. यामुळे सरकारकडून त्यांना आता अर्थिक मदत केली जात आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान सरकराने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती.
यामुळे हे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता मराठवाडा विभागासाठी 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुढील पिकासाठी आता याची शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे.
मराठवाड्यात सलग चौथ्या वर्षे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेला आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या देखील करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज होती. असे असताना औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतजमीन वाहून गेली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे.
'नको म्हटलं तरी पीएम किसान सन्मान निधी माझ्या खात्यावर जमा'
असे असतानाही औरंगाबाद जिल्ह्याला नुकसानभरपाईमधून वगळण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यासाठी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उद्या हे पैसे मिळणार आहेत.
'FRP चा रुपयाना रुपया जोपर्यत शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत एकही कारखाना सुरु होऊ देणार नाही'
दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी शेतातील भाज्या खराब झाल्या आहेत. यामुळे भाज्यांचे दर देखील वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. येणाऱ्या काळात देखील पाऊस असाच राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
पेरु च्या शेतीतून नशीब बदलले, शेटफळचा पेरु पोहोचला केरळच्या बाजारात, दोन एकरात 14 लाखांचे उत्पन्न
१०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार, FRP बाबत महत्वपूर्ण माहिती
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी संपावर, रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध..
Share your comments