पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील कळसच्या गोसावीवाडीतील शेतकरी मधुकर खर्चे यांच्या उसाची पाहणी करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार येथे आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
मधुकर खर्चे एकरात शंभर टन आणि ५० ते ६० कांडी असलेल्या उसाचे उत्पादन घेत आहेत. त्या उसाची पाहणी त्यांनी करत त्यांचे कौतुक देखील केले. त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला थेट कार्यक्रमातून मोबाईलद्वारे संपर्क केला.
३६० ट्रॅक्टर, ७० पोकलेन आणि डझनभर जेसीबी, फडतरीची झाली एक वेगळीच ओळख
तसेच खर्चे यांच्या उसाची पाहणी करून माहिती घेण्याची सूचना केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते. शेतकरी विविध प्रयोगांतून शेतात वाढीव उत्पन्न घेत आहे.
तसेच शरद पवार म्हणाले, शेतकरी चांगल्या उत्पादन घेऊन हीच माहिती ते आनंदात पत्रकारांना देतात. पत्रकारांनी बातमी दिल्यानंतर सरकार म्हणते, शेतकऱ्यांना आता जास्तीचे उत्पन्न मिळत आहे. त्यांच्यावर कर बसवा, यामुळे त्यांचे नुकसान होते.
शेतकऱ्यांनो जास्त उत्पन्न काढा, पण पत्रकारांना उत्पन्न सांगू नका, शरद पवारांचा शेतकऱ्यांना सल्ला
यामुळे ते म्हणाले, माझा तुम्हाला सल्ला असेल, उत्पन्न मिळवा, पण पत्रकारांना माहिती देताना उत्पन्न सांगू नका, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट देखील त्यांनी घेतली.
महत्वाच्या बातम्या;
गरिबांना मोफत रेशन देण्याचा केंद्राचा निर्णय, 81 कोटी नागरिकांना होणार फायदा
तीतर पालनातून करा लाखोंची कमाई, शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर..
लग्नात वाजवले फटाके आणि उसाला लागली आग, ६ लाखाचे नुकसान..
Share your comments