सध्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर 40 साठवणूक केलेल्या कांद्याची थेट चोरी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.
शेतकऱ्याने साठवून ठेवलेल्या तब्बल शंभर क्विंटल कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. याबाबत माहिती अशी की धुळे जिल्ह्यातील कुसुंबा कुसुंबा परिसरातील शेतकरी सुभाष शिंदे त्यांच्याकडे ही चोरी झाली आहे शिंदे यांनी त्यांच्या कांदा चाळीत सुमारे 115 क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. त्यापैकी त्यांनी 15 क्विंटल कांद्याचा मागील महिन्यात विक्री केली होती
त्यातील उरलेल्या 100 क्विंटल चाळीत शिल्लक होता. त्या चाळी शिल्लक कांद्याची चोरट्यांनी एका रात्रीत चोरी केल्याने या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. जर आजच्या कांदा चा भावाचा विचार केला तर किमान भाव हजार रुपये प्रति क्विंटल तर कमाल भाव साधारणतः तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास आहे. यानुसार विचार केला तर कमीत कमी तीन लाखाच्या आसपास फटका या शेतकऱ्याला बसला आहे.
कांद्याचा दरांचा विचार केला तर ते रात्रीतून कमी होतात अगदी त्याप्रमाणे ते वाढतात ही. कांद्याचे दर साधायचे असतील तर अधिक तर शेतकरी कांदाचाळी चा वापर करीत असतात.
त्याचप्रमाणे सुभाष शिंदे यांनी देखील कांद्याची साठवणूक केली होती. शिवाय अपेक्षेप्रमाणे कांद्याचे दरही वाढत होते. प्रति किलो 40 चा दर मिळत होता म्हणून शिंदे यांनी गत आठवड्यात त्यातील 15 क्विंटल कांद्याची विक्री केली होती. परंतु उर्वरित कांद्याची विक्री करण्याचा त्यांचा मानस होता. परंतु चोरट्यांनी होत्याचे नव्हते केले.
Share your comments