1. बातम्या

दहा एकर जमिनीची मालकी आहे ‘ही’ अभिनेत्री; आपल्या निर्णयाने जिंकलं लोकांचे मन


सध्या प्रत्येक जण आपल्या आरोग्याविषयी सतर्क झाला आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाला, फळांना मागणी वाढली आहे. यासह अनेकजण या शेतीकडे वळाले आहेत. यात बॉलीवूड अभिनेते मागे नाहीत, नुकताच भारतीय किक्रेटटर महेंद्रसिंग धोनीने शेतात काम करत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. दरम्यान सध्या लॉकडाऊनच्या काळात अनेक बॉलीवूड अभिनेते आपल्या फार्म हाऊसवर सेंद्रिय प्रकारच्या शेतीत काम करताना दिसत आहेत. अभिनेत्री चुही चावला आठ वर्षापासून शेती करत आहे. जुहीने १० एकर शेत जमिनी मांडवामध्ये घेतली असून तेथे सेंद्रिय पद्धतीने शेती करते.  यासह त्या एक पर्यावरण कार्यकर्ता पण आहेत.

जुही यांच्याकडे मुंबईच्या बाहेरील भाग असलेल्या मांडवामध्ये शेत जमीन आहे. येथे काही तंज्ञ लोकांची टीम सेंद्रिय शेती करतात. दरम्यान ज्या शेतकऱ्यांकडे शेत जमीन नाही त्यांना जुहीने आपली शेत जमीन दिली आहे. या हंगामात शेतकरी भाताची लागवड करू शकतील यासाठी त्यांनी आपली शेत जमीन दिली आहे. या लॉकडाऊनमध्ये आपण निर्णय घेतला आहे की, ज्यांच्याकडे शेत जमीन नाही त्यांना शेतीसाठी जमीन देऊ असं जुहीने सांगितले.

 


माती, जमीन, हवेची माहिती ही शहरी लोकांपेक्षा शेतकऱ्यांना अधिक असते. शहरी लोक फक्त पुस्तके वाचून याची माहिती घेऊ शकतात.  सध्या केल्या जाणाऱ्या सेंद्रिय शेतीत भाताची लागवड करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीतील तंत्रांनी या पिकांवर लक्ष ठेवण्यास जुही यांनी सांगितले आहे. जुही ५२ वर्षाच्या असून त्या आठ वर्षापासून शेती करत आहेत. त्या आपल्या फार्म हाऊसमध्ये  ऑर्गेनिक भाजीपाला पिकवत आहेत.

त्यांच्याकडे आंब्याची २०० पेक्षा जास्त झाडे आहेत,  मी ऑर्गेनिक पिके घेत आहे. महाराष्ट्रातील वाडा येथील फार्म हाऊसमध्ये आपण  सेंद्रिय पिके  घेत असल्याचे जुही म्हणाल्या.  जुही यांच्या वडिलांनी २० एकर जमीन घेतली होती. त्यावेळी आपल्याला शेतीविषयी काही माहिती नव्हती. पण चित्रपटात काम करत असल्याने शेतीकडे लक्ष देता येत नव्हते. त्या नंतर त्यांनी मांडवा येथे दहा एकर जमीन घेतली असल्याचे जुही यांनी सांगितले. 

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters