कोल्हापूर
कोल्हापुरात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पण मागील २४ तासांपासून पावसाने काहीशी उसंत दिली आहे. तर पंचगंगेची मागील २४ तासांत १ इंचाने पाणीपातळी वाढली आहे. यातच राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद करण्यात आला आहे.
राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली होती. पाणीपातळीत वाढ झाल्याने धरणाचे स्वयंचलित ५ दरवाजे उघडल्याने भोगावती नदीत ८५४० क्यूसेक पाणी विसर्ग सुरु होता. मात्र आता १ दरवाजा बंद झाल्याने १४०० क्यूसेक पाणी विसर्ग कमी झाला आहे. तर राधानगरी धरण सध्या १०० टक्के भरलेलं आहे.
दरम्यान, राधानगरी कुंभी, तुळशी, कासारी धरणातून पाणी पंचगंगा नदीमध्ये येत असते. राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाणी पोहोचण्यासाठी १५ तास लागतात. त्यामुळे दिवसभरात पाऊस जरी नाही झाला तरी साधारणपणे नदीची पाणीपातळी ४४ फूटापर्यंत जाऊ शकते.
Share your comments