MFOI 2024 Road Show
  1. बाजारभाव

Onion Price: कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले पाणी! शेतकरी आक्रमक; सरकारकडे केली ही मागणी..

Onion Price: गेल्या ६ महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचा कांदा बाजार नसल्यामुळे वखारीमध्ये साचवून ठेवला होता. शेतकऱ्यांना आशा होती की थोड्या दिवसानंतर कांद्याला चांगले भाव मिळतील पण अजूनही तसे पाहायला मिळत नाही.

ऋषिकेश महादेव वाघ
ऋषिकेश महादेव वाघ
onion farmers

onion farmers

Onion Price: गेल्या ६ महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers) चांगलाच अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीचा कांदा बाजार (Onion market) नसल्यामुळे वखारीमध्ये साचवून ठेवला होता. शेतकऱ्यांना आशा होती की थोड्या दिवसानंतर कांद्याला चांगले भाव मिळतील पण अजूनही तसे पाहायला मिळत नाही.

गेल्या वर्षीचा कांदा अजूनही तसाच पडून आहे. त्यातच आता खरीप हंगामातील (Kharif season) कांद्याची आवक लवकरच बाजारात होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण उन्हाळी कांदा (Summer onion) अजूनही तसाच असल्यामुळे खरीप हंगामातील कांद्याला दर मिळेल का नाही? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

धुळे जिल्ह्यातील शेतकरी अधिक नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि कांद्याला २५ रुपये प्रति किलो भाव मिळवा यासाठी येथील शेतकऱ्यांनी एक दिवसीय आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही.

Tur Rate: तूर उत्पादकांचे अच्छे दिन! बाजारात तुरीला विक्रमी दर, इतके दिवस राहणार तुरीचे दर तेजीत

कांदा हे नाशवंत पीक आहे. त्यामुळे शेतकरी ते जास्त दिवस साठवून ठेऊ शकत नाहीत. आताच्या भावाप्रमाणे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कांद्याला सध्या आठ ते दहा रुपये भाव मिळत आहे. त्यामध्ये शेतकऱ्याचा खर्च देखील निघत नाही.

राज्यात दिवसेंदिवस हवामानात बदल होत आहे. त्यामुळे कांदा चाळीत ठेवलेल्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे बाजार नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

Green Pea Farming: ऑफ सीझनमध्ये वाटाणा पिकातून मिळेल भरघोस नफा; वापरा ही खास पद्धत...

कांद्याला योग्य दर मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आणि संघटनांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री हे देखील कांदा प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

महत्वाच्या बातम्या:
शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास...
धक्कादायक! शेती विकूनही कर्ज संपेना; एकाच साडीला पती-पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या

English Summary: Onion Price: Onion brought tears to the eyes of farmers! Published on: 24 August 2022, 04:23 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश महादेव वाघ. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters