सध्या भाजीपाला दरात वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Agricultural Produce Market Committee) बाजार भावानुसार गवार, मटार, भेंडी, हिरवी, मिरची या भाज्यांचे दर जाणून घेऊया.
काल 28 ऑगस्ट रोजी भेंडीची आवक 480 क्विंटल झाली. यासाठी कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त भाव 5000 रुपये मिळाला. गवार आवक 161 क्विंटल झाली.
यासाठी कमीत कमी भाव 3 हजार आणि जास्तीत जास्त भाव 7 हजार रुपये मिळाला. तर मटारची 230 क्विंटल आवक झाली. याकरिता सर्वसाधारण दर 4 हजार आणि जास्तीत जास्त भाव 7 हजार रुपये मिळाला आहे.
उदगीर बाजार समितीमध्ये (Udgir Bazaar Committee) तुरीला सर्वसाधारण दर 7 हजार 306 रुपये तर जास्तीत जास्त दर 7 हजार 691 रुपये आणि कमीत कमी दर 6 हजार 922 इतका मिळाला आहे.
नागपूर बाजार समितीमध्ये (Nagpur Market Committee) मेथीला कमीत कमी दर 5 हजार रुपये, सर्वसाधारण दर 6 हजार 500 रुपये तर जास्तीत जास्तीत दर 7 हजार मिळाला. परवाच्या बाजारभाव पाहता घट झाली आहे.
28 ऑगस्ट रोजी कोल्हापूर बाजार समितीमध्ये मिरचीला कमीत कमी दर 4 हजार तर सर्वसाधारण दर 5 हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर 6 हजार रुपये इतका मिळत मिळाला होता. त्यानुसार आज घट झालेली दिसून येत आहे.
दिलासादायक! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार रुपयांची मदत
29 ऑगस्ट चे मिरची बाजारभाव
भोकरदन पिपळगाव रेणू या बाजार समितीत (Market Committee) मिरचीला कमीत कमी दर 3 हजार 500 रुपये तर सर्वसाधारण दर 3 हजार 800 रुपये आणि जास्तीत जास्त दर 4 हजार रुपये मिळत आहेत.
पुणे खडकी या बाजार समितीमध्ये कमीत कमी दर, सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर 2 हजार 500 रुपये मिळत आहे.
पुणे मोशी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर 3 हजार तर सर्वसाधारण दर 3 हजार 500 आणि जास्तीत जास्त दर 4 हजार रुपये मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो तुमच्या शेतातून विजवाहिनी गेल्यास किंवा टॉवर उभा केल्यास मिळतो मोबदला; वाचा 'या' कायद्याविषयी
Goat Farming: शेळीच्या 'या' 4 जाती शेतकऱ्यांना मिळवून देतील चांगला नफा
Today Horoscope: सूर्य-शुक्र एकाच राशीत असल्यामुळे नशीब चमकण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Share your comments