Banana Price: यंदाच्या मौसमात केळीला (Banana) चांगला भाव मिळत होता. मात्र केळीची आवक वाढल्याने पुन्हा एकदा केळीचे दर घसरले (Banana prices fell) आहेत. अतिवृष्टी आणि रोग यामुळे शेतकरी (Farmers) त्रस्त झाला आहे. आता त्याच भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. मात्र आता शेतकऱ्यांना गणपतीच्या दिवसात केळीचे भाव वाढण्याची अपेक्षा आहे.
महिनाभरातच केळीचा भाव क्विंटलमागे तीन हजार रुपयांवरून १ हजार ५०० रुपयांवर आला आहे. क्विंटल आवक वाढल्याने भाव कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी केलेल्या खेळामुळे केळीचे भावही गडगडले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील खान्देशातील व्यापाऱ्यांनी कमी दरात केळीचे व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाही दरावर परिणाम होत आहे. आता दीपावली, गणेशोत्सव यांसारख्या सणांमध्ये केळीचे भाव सुधारतात की नाही हे पाहावे लागेल.
Gold Silver Price: सोन्या चांदीच्या दरात नरमाई! चांदी 24300 रुपयांनी स्वस्त...
केळीचे उत्पादन घटले
यंदा निसर्गाच्या प्रकोपामुळे जळगाव, खान्देशसह अन्य जिल्ह्यांमध्ये केळीच्या उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच केळीचा भाव थेट दोन हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेला. यासोबतच आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने या केळीचा भाव थेट तीन हजार रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला होता.
केळी उत्पादकांना चांगले दिवस आले, उत्पादन कमी असले तरी इतर राज्यांतूनही केळीला मागणी वाढत होती. त्यामुळे विक्रमी दर मिळू लागला. मात्र गेल्या काही दिवसांपासून बिहार, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून केळीची आवक वाढली आहे. त्यामुळे केळीचा भाव 1 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
व्यापारी कमी भावाने खरेदी करत आहेत
नियमानुसार बाजार समितीने जाहीर केलेल्या भावात केळीची खरेदी व्हायला हवी, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय जिल्ह्यातील रावेर बाजार समितीच्या माध्यमातून केळीचे दर जाहीर केले जातात. दर्जेदार केळीसाठी 2 हजार 200 रुपये भाव जाहीर केला जात आहे, मात्र खरेदीदार वेगवेगळी कारणे सांगून या दराकडे दुर्लक्ष करून कमी दराने खरेदी करत आहेत.
Nitin Gadkari: "विहीरीत उडी मारेल पण काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही"
यावर सर्वच खरेदीदारांनी सहमती दर्शवल्याने शेतकरीही वैतागले आहेत. त्यामुळे ज्या केळीचा भाव तीन हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जायचा. आता तो थेट 1 हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेला आहे.सध्या नाशिक जिल्ह्यात केळीचा किमान भाव 850 रुपये प्रतिक्विंटल आहे. नागपुरात किमान भाव 450 रुपये प्रतिक्विंटल आहे.
केळीची किंमत काय आहे
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या (Maharashtra State Board of Agriculture Marketing) म्हणण्यानुसार, 27 ऑगस्ट रोजी नागपूर (Nagpur) मंडईत शेतकऱ्यांना 450 रुपये प्रति क्विंटल असा किमान भाव मिळाला. सरासरी दर 525 होता, तर कमाल 550 रुपये होता.
नाशिक मंडईत (Nashik Market) 180 क्विंटल केळीची आवक झाली. येथे किमान भाव 850 रुपये प्रतिक्विंटल होता.तर सरासरी दर 1200 तर कमाल 1500 रुपये होता. जळगाव मंडईत किमान भाव 1000 रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी दर 1500 रुपये होता. तर कमाल दर 1600 रुपये होता.
महत्वाच्या बातम्या:
संकटाची मालिका संपेना! पावसातून सावरताच पिकांवर कीड आणि रोगांचे सावट; शेतकरी चिंतेत...
राहुल गांधी काँग्रेसची कमान सांभाळणार की दुसऱ्या कोणाच्या हाती काँग्रेस जाणार? आज होणार अंतिम निर्णय...
Share your comments