1. फलोत्पादन

Contract Farming:जाणून घेऊ करार शेती म्हणजे काय आणि तिचे फायदे

जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार त्यामुळे आता सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसतात. शेती क्षेत्र व्यतिरिक्त अन्य क्षेत्रामध्ये बदल करणे तुलनेने सोपे असल्याने जागतिक बाजारपेठेच्या अनुषंगाने अनेक बदल वेगाने झाले. जर भारताचा विचार केला तर भारतामधील 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cortesy-utkal today

cortesy-utkal today

जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार त्यामुळे आता सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल झालेले दिसतात. शेती क्षेत्र व्यतिरिक्त अन्य क्षेत्रामध्ये बदल करणे तुलनेने सोपे असल्याने जागतिक बाजारपेठेच्या अनुषंगाने अनेक बदल वेगाने झाले. जर भारताचा विचार केला तर भारतामधील 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.

एवढ्या मोठ्या विस्तारित क्षेत्रात व्हावेत एवढे बदल झालेले अजून दिसत नाहीत. शेती व्यवसाय हा निसर्ग धार्जिणे असल्यामुळे एकदा केलेले योग्य नियोजन देखील कोलमडून पडते. तसेच आजही कृषी क्षेत्राकडे व्यापारी दृष्टिकोनातून पाहिले जात नाही. म्हणजे आजही बाजारपेठेचा अभ्यास आणि त्याचे विश्लेषण या बाबी सर्व शेतकऱ्यांच्या आवाक्यात नाहीत. त्यासाठी शेतकरी वर्ग सजग होणे गरजेचे आहे. अजूनही बऱ्याच समस्या शेतीपद्धतीत आहेत. त्यामध्ये काही अंशी बदल करण्यात येत आहेत. काही शेती पद्धती देखील बदलत आहेत.या लेखात आपण करार शेती म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊ.

 कंत्राटी किंवा करार शेती म्हणजे काय?

 ग्राहकांची जी मागणी असते त्यानुसार उत्पादकांकडून उत्पादन तयार करून घेण्यासाठी एखादा मध्यस्थ, संस्था किंवा कंपनी शेतकऱ्यांशी करार करते. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या उत्पादनाचा ग्राहक आणि त्यांची पसंती याला असते. सर मागील पंधरा ते वीस वर्षांचा विचार केला तर पंजाब राज्यांमध्ये करार शेतीला सुरुवात झाली.

त्या अगोदर बीजोत्पादन करणाऱ्या सरकारी किंवा खाजगी कंपन्या करार पद्धतीने शेतकऱ्यांकडून बियाणे उत्पादित करत असत. बियाण्यांचा ग्राहक हा सामान्यता शेतकरी असतो. त्यालाच नजरेसमोर ठेवून बियाण्यांचे आवश्यकतेनुसार उत्पादन घेतले जाते. त्यानंतर पुढे योग्य त्या प्रक्रिया उपचार करून त्यांचा पुरवठा केला जातो. या कामामध्ये शेतकरी हा एकटा गृहीत न धरता शेतकऱ्यांच्या गटांना प्राधान्यक्रम देण्यात येतो. अशा प्रकारे प्रक्रिया करणाऱ्या काही कंपन्या पुढे आल्या.सुरुवातीला उपलब्ध शेतीच्या मालावर प्रक्रिया करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात आले. सुरुवातीच्या काळात काही ग्राहकांनी ते स्वीकारलेही. मात्र यापुढे जागतिक बाजारपेठेतील अन्य देशातून येणाऱ्या किंवा मोठ्या कंपन्यांच्या माला बरोबर ग्राहक या मालाची तुलना करू लागला. सर्वसामान्य ग्राहक हा जागृत असल्यामुळे त्यांची मागणी व पसंती यामध्ये बदल होत गेले.

यामध्ये काही घटकांनी ग्राहकांची गरज आणि त्यांची मागणी आणि नेमकी आवश्यकता काय आहे याचा अभ्यास केला. एखाद्या प्रक्रिया उद्योगाला  पक्या मालाच्या उत्पादनामध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा, दर्जाचा शेतीमाल पाहिजे याकडे लक्ष केंद्रित केले.कारण कोणत्याही पक्क्या मालाची प्रत ही त्यात वापरलेल्या कच्च्या मालावर आधारित असते. यामुळे व्यावसायिक अशा दर्जाच्या कच्च्या मालासाठी अधिक दर देण्यास तयार होतात. त्यातही विखुरलेल्या शेतकऱ्यांऐवजी एकत्रित गट असल्यास व्यवहार करणे सोपे होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातही शेतीमालाची प्रत योग्य मिळण्यासाठी ठराविक भागाची निवड केली जाते. तसेच उत्पादन काढण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेले विशिष्ट प्रकारचे बियाणे,उत्पादन तंत्र, काढणी, प्रतवारी,, प्र तपासणी, पॅकिंग, वाहतूक आणि साठवणूक कशात काही किंवा सर्व सोय उपलब्ध करून देतात. या सर्व गोष्टींसाठी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. ती लक्षात घेऊन अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांनाही सहभागी करून घेतले जाते.

 ग्राहकांच्या पसंतीला उतरेल अशा उत्पादनासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा उभी केली जाते.

यामध्ये सर्व घटकांचा एकमेकांशी करार असतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर शेती मधून निघणारा माल शेतकरी कंपनीला देईल तसेच कंपनीने ठरवून दिलेल्या गुणप्रतीनुसार मालतयार झाला तर ठरवून दिलेल्या किमतीला विकत घेईल.तसेच उत्पादन घेण्यासाठी लागणारा अर्थपुरवठा आणि केलेला अर्थपुरवठा परत करण्याची हमी कंपनी अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था व शेतकऱ्यांना देईल असे एकंदरीत याचे स्वरूप असते. शेती व्यवसाय तुलनेने अनियमित असतो. शेती मालाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज फेडणे शक्य व्हावे यासाठी अनेक वेळा विमा कंपन्यांनाही या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले जाते. अशा पद्धतीने एकाच उद्देशाने एकत्र येऊन शेतीमधून उत्पादन काढण्यासाठी एकमेकांशी केलेला करारम्हणजेच करार शेती होय.. करार शेतीचे सर्वोत्तम उदाहरण द्यायचे झाले तर आता सुरू असलेला कुक्कुटपालन व्यवसाय होय. ( संदर्भ- ॲग्रोवन )

English Summary: whats meaning of contract farming and what is benifit of contract farming? Published on: 27 December 2021, 06:02 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters