हंगामी पीक असो किंवा मुख्य पीक असो शेतकऱ्यांचे अधिकचे उत्पन्न हे ठरलेले असते तसेच पीक पद्धतीमध्ये बदल करून शेतकरी आपला उद्देश साध्य करीत असतो. कलिंगड हे एक असे फळपीक आहे जे तिन्ही टप्यात शेतकऱ्यांच्या पदरी पडले जाते. सध्या जे बाजारात कलिंगड येत आहेत ते उन्हाळ्यात विक्री करता यावी यासाठी लागवड केलेली आहेत. कलिंगड तोडणीचा दुसरा टप्पा हा रमजान महिन्यात येणार आहे. काही दिवसाच्या फरकाने ज्या कलिंगडाची लागवड केली आहे ती जास्त उत्पादन देऊन जातात. हंगामाच्या सुरुवातीला कलिंगडाला १० रुपये असा दर मिळाला. मागील दोन वर्षात जे कोरोनामध्ये घडले ते भरून काढण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. एका बाजूला बाजारात कलिंगड फळाची विक्री सुरू आहे तर दुसऱ्या बाजूला काही भागात अजून कलिंगडाची लागवडच सुरू आहे.
मुबलक पाणी आणि पोषक वातावरण :-
यंदा कलिंगड फळासाठी पोषक वातावरण आहे मात्र मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या ओढत्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी कलिंगडकडे पाठच फिरवली आहे तर काही लोक मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. यंदा चांगल्या प्रमाणावर पाऊस पडला असल्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तर मिटली आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी तर खरीप हंगामानंतर शेतजमिनीची मशागत करून कलिंगड फळाची लागवड केली आहे. तसेच यंदा मुबलक प्रमाणात पाणी व पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने सर्वकाही यशस्वीपणे होईल. बाजारात कलिंगडाला चांगले दर सुद्धा मिळत आहेत त्यामुळे उत्पनाच्या बाबतीत काही शंका च राहिलेली नाही.
व्यापारी थेट बांधावर :-
ज्या गोष्टीची बाजारात जास्त मागणी त्यास दरही चांगला मिळतोच. पहिल्या टप्यात जी कलिंगडाची लागवड करण्यात आली त्याची सध्या तोडणी सुरू असून व्यापारी वर्ग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. कलिंगडाच्या शुगर किंग आणि मक्स या वानाला जास्त मागणी आहे. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यानी एकरी ६ टन कलिंगडाचे उत्पादन काढले आहे. जे मुख्य पिकातून घडले नाही तर यंदाच्या हंगामात कलिंगडाच्या बाबतीत घडत आहे.
कलिंगडाला मोठ्या प्रमाणावर मागणी :-
उन्हाळा म्हणले की नागरिकांचा भर असतो तो म्हणजे फळांवर. फळ म्हणले को मग कलिंगड जे की जास्तीत जास्त नागरिक कलिंगडाचे शौकीन असतात. बाजारात सुद्धा कलिंगडाला चांगला दर भेटत असून शेतकऱ्यांना सुद्धा चांगला फायदा होत आहे. यंदा कलिंगडाला चांगलेच दर भेटणार आहेत असा अंदाज शेतकऱ्यांनी लावलेला आहे. त्यामुळे आपणास आता पाहावे लागणार आहे की कलिंगड उत्पादकांच्या बाबतीत काय घडणार आहे.
Share your comments