सध्या लागवडीखाली असलेल्या संकरित जाती आणि पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे शेतामध्ये एकापेक्षा जास्त हंगामात एका पाठोपाठ पिके घेतली जातात. पर्यायाने जमिनीला विश्रांती मिळत नसल्यामुळे तसेच रासायनिक खतांचा बेसुमार वापर इत्यादी कारणांमुळे क्षारपड होत आहेत.
बऱ्याच वर्षांपासून सेंद्रिय पदार्थांचे कमतरतेमुळे जमिनीचा कस कमी होत आहे. अशा जमिनीचा कस टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कंपोस्ट खत महत्त्वाचे ठरते. या लेखात आपण कंपोस्ट खत तयार करण्याच्या दोन पद्धती जाणून घेणार आहोत.
कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती
इंदौर पद्धत
- या पद्धतीला ढीग पद्धत असे देखील म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे सहा फूट रुंद व पाच ते सहा फूट उंच आणि सेंद्रीय पदार्थांची उपलब्धता यानुसार लांबी ठेवली जाते. यामध्ये शेतातील उरलेले पिकाचे अवशेष, काडीकचरा, शेतातील तण आणि शेणइत्यादी सेंद्रिय पदार्थांचा एकथरठेवला जातो.
- ढीग पद्धतीमध्ये कुजण्याची प्रक्रिया उघड्यावर म्हणजेच ऑक्सिजनयुक्त वातावरनात होते. ही प्रक्रिया लवकर होण्याकरिता एका महिन्याच्या अंतराने ढीग वरखाली करून कुजणारे पदार्थ एकजीव केले जातात.
- ओलावा टिकावा यासाठी अधून मधून पाणी शिंपडले जाते.
- तसेच ढिगावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकल्यास तापमानात वाढ होऊन कुजण्याची क्रिया जलद होण्यास मदत होते.
- त्या प्रक्रियेमध्ये तीन ते चार महिन्यात चांगले कंपोस्ट खत तयार होते.
बेंगलोर पद्धत
- या पद्धतीला खड्डा पद्धत म्हणतात. बेंगलोर पद्धतीमध्ये सर्वात खालचा थर पंधरा ते वीस सेंटीमीटर जाडीचा काडीकचरा व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन पाणी शिंपडून गोळा केला जातो.
- अशाप्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत शेणमाती मिश्रण करून लिंपून घेतले जाते.
- सेंद्रिय पदार्थांची कुजण्याची क्रीया लवकर होण्याकरिता अधून मधून पाणी शिंपडले जाते.
- कुजण्याची क्रिया सुरुवातीला ऑक्सिजन विरहीत वातावरणात होत असल्याने कुजण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे खत तयार होण्यास थोडा अधिक वेळ लागतो.
- या पद्धतीमध्ये अन्नद्रव्य वाया जाण्याचे प्रमाण कमी असते.
Share your comments