महाराष्ट्रामध्ये असो की संपूर्ण भारतातविविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात शेतकरी करत आहेत.एकंदरीत यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे फळबागांची लागवड महाराष्ट्रात होते.
त्यामध्ये डाळिंब, द्राक्षे, सीताफळाची देखील लागवड मोठ्या प्रमाणात होते. यामध्ये जर पपई पिकाचा विचार केला तर पपईची शेती शेतकरी वर्षभर करतात. बरेच शेतकरी आता व्यावसायिक तत्वावर पपईची लागवड करीत असून शेतकऱ्यांना याचा फायदा देखील मिळत आहे.
पपई फळ बागेचे व्यवस्थापन व्यवस्थापन शेतकऱ्यांना खूप नफा देऊन जाते.परंतु इतर लोकांसारखे पपईवर देखील विविध प्रकारचे रोग व किडींचा प्रादुर्भाव होतो. याचा वेळीच योग्य व्यवस्थापनाने उपाययोजना केल्या नाहीत तरशेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते.
या लेखात आपण पपईची विविध प्रकारच्या रोगांपासून कसा बचाव करायचा हे जाणून घेणार आहोत.
नक्की वाचा:शेतकरी दादांनो : आंबा लागवडीसाठी या 'टीप्स' वापरा, होईल फायदा अन मिळेल भरघोस उत्पादन
पपई पिकावरील विविध रोग
जर आपण पपईचा विचार केला तर यामध्ये मूळ आणि खोड कुजणे हाय प्रमुख रोग आहे. या रोगामध्ये मुळे किंवा देठ कुजल्याने झाड मरते. या रोगाचे पहिले लक्षण म्हणजे देठावर काही ठिपके दिसून येतात व त्यानंतर वाढतात व पूर्ण देठा भोवती पसरतात.
अशा पद्धतीने पपईच्या रोगापासून करावे संरक्षण
1- ज्या जमिनीत पाणी साचत असेल अशा ठिकाणी पपईची लागवड करू नये.
2- पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था पपई बागेत करावी.
3-देठावर ठिपके दिसल्यास, रिडोमिल( मेटालोक्सिल) किंवा मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण तयार करून रोपांच्या देठाजवळील पाच सेंटीमीटर खोलीचे माती काढून चांगले पाणी द्यावे.
4- रोगग्रस्त झाडे उपटून टाकावेत आणि जमिनीत गाडून टाका किंवा शेताबाहेर काढून जाळून टाकावे.
5- झाडाच्या सभोवतालची माती एक टक्के बोर्डो मिश्रणाने प्रक्रिया करून पाणी द्यावे. हे काम रोगाच्या तीव्रतेनुसार जून-जुलैमध्ये दोन ते तीन वेळा करावे.
6- लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा एक किलो प्रति 100 खड्ड्यांसाठी टाकावे किंवा कंपोस्टमध्ये मिसळल्यानंतर प्रत्येक खड्ड्यात पाच ते सहा किलो वापरावे.असे केल्याने रोगाची तीव्रता कमी होऊन झाडांची वाढ चांगली होते.
7- डॅम्पिंग ऑफ नावाचा रोगापासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपाययोजनादेखील लक्षात ठेवले पाहिजे. हे टाळण्यासाठी रोपवाटिकेच्या मातीवर फॉर्मल्डीहाईड 2.5 टक्के द्रावणाची प्रक्रिया करून 48 तास पॉलीथिनने झाकून ठेवावी. हे काम रोपवाटिका लागवडीच्या 15 दिवस आधी करावे.
8- रोपवाटिकेत हा रोग रोखण्यासाठी रिडोमिल(मेटालोक्सिल) एमझेड 78( दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात) फवारणी एक आठवड्याच्या अंतराने करावी.
9- पावसात रोपवाटिका प्लास्टिकने झाकून ठेवावी.
10- रोपवाटिकेची जागा बदलली पाहिजे.
नक्की वाचा:राज्यातील डाळिंबाच्या बागा धोक्यात, जाणून घ्या यामागील रहस्य
Share your comments