सुरवातीपासून पीकाची सदृढ वाढ झाल्यास फुलधारणा उत्तम होतेच,परिनामी फळांची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होते. म्हणूनच पिकास सुरवातीपासून योग्य खते द्यावीत.
पिकाच्या सदृढ वाढीसाठी महत्वाची खते:-लागवडी आधी शेणखत, कोंबडीखत,हिरवळीची खते(ताग, ध्येंच्या)यांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधाण्यासोबत पिकाची सदृढ वाढ होते.यानंतर नत्र, स्फुरद,पालाश यांचा वापर सुद्धा फुल व फळधारणेवर परिणाम करतो.नत्र पिकाच्या कायिक वाढीसोबत पानांचा आकार-नवीन फुटवे वाढवतो.
पाने वाढल्याने झाडास अन्नपूरवठा चांगल्या पद्धतींने होतो.त्यासाठी युरिया,अमोनियम सल्फेट, कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट ही रासायनिक खते उपयुक्त आहेत.जी पिकास नत्र उपलब्ध करून देतात.यानंतर फुल व फळधारनेसाठी महत्वाचे अन्नद्रव्य म्हणजे पालाश.या द्रव्यामुळे प्रामुख्याने पिष्टमय पदार्थाची निर्मिती आणि त्यांचे साखरेत रूपांतर होणे या क्रिया गतीशील होतात. त्यामुळे ऊस, कलिंगड, रताळी, फळे या शर्करायुक्त पिकांना या अन्नद्रव्याची गरज जास्त असते.या अन्नद्रव्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते. फळांना व फुलांना चांगला रंग आणि आकार येतो. फळे- फुले व पालेभाज्यांचा साठवणूक काळ वाढतो. त्यामुळे कृषि मालाचा दर्जा- सुधारण्यासाठी मदत होते.
पाने वाढल्याने झाडास अन्नपूरवठा चांगल्या पद्धतींने होतो.त्यासाठी युरिया,अमोनियम सल्फेट, कॅल्शियम-अमोनियम नायट्रेट ही रासायनिक खते उपयुक्त आहेत.जी पिकास नत्र उपलब्ध करून देतात.यानंतर फुल व फळधारनेसाठी महत्वाचे अन्नद्रव्य म्हणजे पालाश.या द्रव्यामुळे प्रामुख्याने पिष्टमय पदार्थाची निर्मिती आणि त्यांचे साखरेत रूपांतर होणे या क्रिया गतीशील होतात.
त्यामुळे ऊस, कलिंगड, रताळी, फळे या शर्करायुक्त पिकांना या अन्नद्रव्याची गरज जास्त असते.या अन्नद्रव्यामुळे साखरेचे प्रमाण वाढते. फळांना व फुलांना चांगला रंग आणि आकार येतो. फळे- फुले व पालेभाज्यांचा साठवणूक काळ वाढतो. त्यामुळे कृषि मालाचा दर्जा- सुधारण्यासाठी मदत होते.
Share your comments