पपईच्या अनेक सुधारित जाती प्रसारित करण्यात आले आहेत. उद्दिष्टानुसार फळासाठी आणि पेपेन साठी वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते. या लेखामध्ये आपण पपईच्या काही महत्त्वाच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेऊ.
या आहेत पपईच्या काही सुधारित जाती
- वॉशिंग्टन- ही पपईची एकलिंगी जात आहे.पानाचे देठ जांभळ्या रंगाचे असतात.फळे लंब वर्तुळाकार, गर केशरी व चवदार असतो. फळाचे सरासरी वजन दीड ते दोन किलो असते. फळांमध्ये बिया फार कमी असतात. ही जात पेपेन साठी उपयुक्त नाही.
- कुर्ग हनीड्यु- ही जात मधुविंदूया नावाने ओळखले जाते.या जातीचे फळ मध्यम ते मोठे,आकार अंडाकृती, रंग पिवळट हिरवा, गर नारंगी व खूप गोड आहे. मादी व द्विलिंगी फुले येतात.म्हणून सर्व झाडांना फळे येतात. झाडे निमठेंगणी असतात. फळांची प्रत उत्तम असल्याने बाजारभाव चांगला मिळतो.
- सोलो- ही जात द्विलिंगी आहे.परसबागेसाठी उत्तम असूनगरसोनेरी किंवा गुलाबी रंगाचा व फार गोड असतो.पिकलेल्या फळावर डाग येत नाहीत. स्वाद व चव उत्तम असल्याने बाजारात देखील चांगली मागणी असते.
- पुसा डेलिसिअस-ही जात द्विलिंगी आहे. लागवडीपासून आठ महिन्याच्या आत 80 सेंटीमीटर उंचीवर फळे लागण्यास सुरुवात होते.फळाची प्रत व उत्पादन सर्वात उत्कृष्ट आहे.फळाची उत्तम चव व स्वाद, नारिंगी गर,फळांचा आकार मध्यम ते मोठा व लंबा गोलाकार असतो.फळांचे वजन एक ते दोन किलो ग्रॅम भरते.
- पुसा मॅजेस्टि-ही जात द्विलिंगी आहे.झाडांची उंची 196 सेंटिमीटर असते. रोप लावणी पासून 146 दिवसांनी फळधारणेच्या सुरुवात 48 सेंटिमीटर उंचीवर होते. विशाणुरोगाला प्रतिकारक आहे. फळे मध्यम आकाराची व गोल असतात. फळाचे सरासरी वजन एक ते दीड किलो ग्रॅम वफळे टीकाऊअसतात.
- तैवान 786-या जातीच्या झाडात नर जातीच्या झाडांची पैदास होत नाही. सर्व झाडांना फळे लागतात.फळे लांबट, जाड गराची व गोड व स्वादिष्ट असतात.फळांचा आकार हंगामानुसार बदलतो. बियांचे प्रमाण कमी असते.फळाचे वजन एक ते तीन किलो ग्रॅम असते.
Share your comments