सध्या बर्याच वर्षापासून निव्वळ उदरनिर्वाहासाठी शेती ही संकल्पना मागे पडत चालले असून शेतीला एक व्यावसायिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून केले जात आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या फळ, भाजीपाला व ही पिके पिकवताना होणारा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेती आता व्यापारी दृष्टिकोनातून शेतकरी करू लागले आहेत. या पद्धतीत जो काही बदल झाला त्यामध्ये विदेशी फळांची लागवड तसेच विविध प्रकारच्या विदेशी भाजीपाला जसे की, ब्रोकोली, झुकीनी सारख्या भाजीपाला पिकाची देखील लागवड आता शेतकरी करतात.
आपण नवीन पद्धतीच्या फळबागांचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरीची शेती फार मोठ्या प्रमाणावर सध्या केली जात आहे.
जर आपण भारताचा विचार केला तर स्ट्रॉबेरीची शेती ही राजस्थानसारख्या उष्ण हवामान असलेल्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आपण पडीक जमिनीवर देखील स्ट्रॉबेरी लागवड करून कसे यशस्वी होता येईल? याबद्दलचे महत्त्वाची माहिती या लेखात करणार आहोत.
ही पद्धत ठरेल पडीत जमिनीवर स्ट्रॉबेरी लागवडीसाठी महत्त्वाची
जर आपण एकंदरीत वातावरणानुसार विचार केला तर थंड हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करणे सोपे आहे. परंतु सामान्य तापमान असलेल्या ठिकाणे पडीक जमिनीवर स्ट्रॉबेरी शेती करणे महत्त्वाचे असून यासाठी शेतकरी बांधव प्लास्टिक मल्चिंग आणि ठिबक सिंचनाचा वापर करून चांगले उत्पादन मिळवू शकतात.
अशा भागांमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर यादरम्यान स्ट्रॉबेरीचा रोपांची लागवड केली जाते व डिसेंबर ते मार्च पर्यंत स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून चांगले उत्पादन हातात यायला लागते. अशा ठिकाणी जर स्ट्रॉबेरीची लागवड करायचे असेल तर सगळ्यात आगोदर माती परीक्षण करून घेणे गरजेचे आहे व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने हव्या त्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करणे देखील गरजेचे आहे.
ही पद्धत ठरेल स्ट्रॉबेरी लागवडीसाठी फायद्याची
जर आपण स्ट्रॉबेरी या फळपिकाच्या विचार केला तर हे चिकन माती असलेल्या जमिनीमध्ये चांगली वाढते. यामध्ये सुरवातीला लागवड केल्यानंतर वीस दिवस हलकेसे पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. जर एकंदरीत स्ट्रॉबेरी रोपांचा विचार केला तर दीड एकर क्षेत्रात 35 ते 40 हजार रुपयांची आवश्यकता भासते.
परंतु चांगले व्यवस्थापन केले तर त्यातून सहा ते सात लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. एकंदरीत लागवडीसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येऊ शकतो. परंतु पाच महिन्यांमध्ये तीन ते चार लाखांचा निव्वळ नफा देखील मिळवता येतो.
स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी असलेल्या महत्त्वाच्या जाती
स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी योग्य जातींचा विचार केला तर रानिया, मोखरा,कडलर इत्यादी जातींची लागवड भारतामध्ये केली जाते. तसेच स्वीट चार्ली आणि विंटर डाऊन यासारख्या जाती या पडीक जमिनीवर लागवड करण्यासाठी सर्वोत्तम आहेत व यापासून चांगले उत्पादन मिळवता येते.
स्ट्रॉबेरी रोपांचा विचार केला तर ते वाहतूक खर्च वगैरे पकडून एका रोपाची किंमत दहा ते तीस रुपये दरम्यान होते. परंतु स्ट्रॉबेरीचे फळ हे दोनशे रुपये किलो दराने विकली जातात.
पडीत म्हणजेच नापीक जमिनीवर देखील स्ट्रॉबेरी शेती करता येते त्याची ही आहेत उत्तम उदाहरणे
आपल्याला माहित आहे कि राजस्थान आणि बुंदेलखंड या भागातील बर्याचशा जमिनींना पडीक आणि कोरडवाहू आहेत. त्यावर पिके घेणे खूप अशक्य असते परंतु नवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून या भागात देखील आता स्ट्रॉबेरीचे पीक चांगल्या पद्धतीने घेतले जात आहे.
एकंदरीत आपण विचार केला तर या दोन्ही तापमान जास्त आणि नापिक असलेल्या प्रदेशांमध्ये देखील स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुन्देलखण्ड मधील शेतकरी हरलीन चावला यांचे कौतुक केले होते कारण त्यांनी बुंदेलखंड सारख्या भागांमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन यशस्वी घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते.
नक्की वाचा:Crop Technology: फळबागेमध्ये हवे भरपूर उत्पादन तर करा संजीवकांचा वापर, होईल आर्थिक फायदा
Share your comments