1. फलोत्पादन

Agri Information: लिंबूवर्गीय फळांची फळगळ होण्याची कारणे आणि उपाय,वाचा कृषी तज्ञांचा सल्ला

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
fruit drop in orange orchred

fruit drop in orange orchred

आपल्याला माहित आहेच कि बऱ्याच प्रमाणात फळबागांमध्ये जेव्हा फळांची सेटिंग झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात फळगळ होण्याची समस्या निर्माण होते. खासकरून लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये ही समस्या तीव्रतेने जाणवते. यासाठी फळगळ होण्याची नेमकी कारणे कोणती आहेत? आणि त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे असते. याबाबतीत तज्ञांचे म्हणणे काय आहे? या विषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:अतिशय महत्त्वाचे! 'या' तंत्रज्ञानाचा वापर केला तर जगतील कोरडवाहू फळझाडे,मिळेल फायदा

 कृषी तज्ञांच्या मते

 औरंगाबाद येथील फळ संशोधन केंद्र हिमायतबागचे प्रभारी अधिकारी डॉ.एम.बी.पाटील यांनी म्हटले की, जेव्हा झाडांना फळधारणा होते त्यानंतर होणारी फळगळ वनस्पती शास्त्रीय कारणामुळे होत असते

आणि ही फळगळ मे आणि जून महिन्यात प्रामुख्याने होत असल्याने त्याला जूनगळ असेदेखील म्हटले जाते. जेव्हा फळांचा आकार 0.5 ते दोन सेंटिमीटर आकाराचा होतो तेव्हा ही गळ होते.

 वाढीच्या अवस्थेतील कारणे

 वाढीच्या अवस्थेतील जे फळे असतात त्यामध्ये कर्बोदके, पाणी आणि संजीवकांसाठी जी काही स्पर्धा होते, यामुळे देखील फळगळ होते.या कालावधीदरम्यान जर पाण्याचा ताण पडला किंवा वातावरणात असलेल्या तापमानामध्ये वाढ झाली तर लहान फळे जास्त काळ टिकू शकत नाहीत.

किंवा सततचा पावसामुळे अपुरा सूर्यप्रकाश व मुळाची अकार्यक्षमता यामुळे खास करून आंबिया बहराच्या मोसंबी बागांची फळगळ मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येते.

अपुऱ्या सूर्यप्रकाश अभावी प्रकाश संश्‍लेषणाची जी काही महत्त्वपूर्ण प्रक्रिया असते ती मंदावल्यामुळे देखील वाढत्या  फळांना आवश्यक कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो व त्यामुळे फळांमध्ये पेशीक्षय होतो. फळांच्या चांगल्या वाढीसाठी कार्बन आणि नत्राचे संतुलन योग्य असते तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे फळांचा पेशीक्षय क्रिया कमी होते.

नक्की वाचा:डाळिंब व्यवस्थापन:करा अंमलबजावणी 'या' गोष्टींची,मिळेल डाळिंबापासून भरघोस उत्पादन आणि येईल आर्थिक समृद्धी

उपाययोजना

 पाण्यामध्ये असलेल्या एकूण नत्रापैकी अमोनिया या संयुगाची मात्रा फळांच्या व निरोगी वाढीसाठी खूप महत्त्वपूर्ण असते. ही मात्रा शिफारशीत नत्रयुक्त खतांच्या फवारणीतून वाढवता येऊ शकते.

आंबिया बहराची फळधारणा होते त्यानंतर मे आणि जून महिन्यात संजीवके,बुरशीनाशक व अन्नद्रव्यांची फवारणी घेतली नसेल तर ती शिफारशीनुसार वेळेत व शिफारशीत मात्रेत त्यांच्या फळे तोडणेपूर्वी फवारण्या करून घ्याव्यात.

कॉलेट्रोट्रीकम, थिओब्रॉमी यासारख्या व इतर बुरशी फळाच्या देठाच्या माध्यमातून फळांमध्ये प्रवेश करतात व पूर्ण वाढलेल्या फळाचे नुकसान करतात. या व इतर बुरशी यांचा जो काही प्रसार होतो तो झाडावर जे काही वाळलेल्या फांद्या असतात त्यामुळे होतो. तसेच काळी माशी आणि मावा यांसारख्या किडींचा प्रादुर्भावामुळे पानांवर शर्करायुक्त चिकट पदार्थ असतो व त्यामुळे देखील बुरशी वाढते.

यासारख्या बुरशीच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.फायटोप्थोरा सारख्या बुरशीचा प्रादुर्भाव झाला असेल तर झाडावरच्या खालच्या बाजूचे फळे अगोदर सडण्यास सुरुवात होते. त्याच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्सिल+ मॅन्कोझेब( संयुक्त बुरशीनाशक)2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

नक्की वाचा:Fertilizer Management:करा 'या' खतांचा वापर आणि मिळवा लिंबू पासून भरघोस उत्पादन चांगला नफा

English Summary: this is main reason behind fruit drop to citrous orchred and management Published on: 30 August 2022, 01:57 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters