1. फलोत्पादन

Fruit Export Tips: फळबागातदार आहात आणि फळांची निर्यात करण्याचा तुमचा प्लान आहे, तर 'या' गोष्टींचे घ्याल काळजी तरच मिळेल फायदा

फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात कल आहे. जर आपण फळबागांचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केली जाते. शेतीमध्ये येत असलेले नवयुवक मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळत आहेत. जर आपण बऱ्याच फळ पिकांचा विचार केला तर निर्यातीला खूप मोठ्या संधी आहेत. परंतु फळांची निर्यात करताना बऱ्याच गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
norms for fruit export

norms for fruit export

 फळबाग लागवडीमध्ये शेतकऱ्यांचा आता मोठ्या प्रमाणात कल आहे. जर आपण फळबागांचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये विविध प्रकारच्या फळबागांची लागवड केली जाते. शेतीमध्ये येत असलेले नवयुवक मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे वळत आहेत. जर आपण बऱ्याच फळ पिकांचा विचार केला तर निर्यातीला  खूप मोठ्या संधी आहेत. परंतु फळांची निर्यात करताना बऱ्याच गोष्टींचे पालन करणे खूप गरजेचे असते.

नक्की वाचा:Banana Farming: केळीच्या कांदेबाग लागवडीच्या माध्यमातून हवे भरपूर उत्पादन तर अशा पद्धतीचे व्यवस्थापन आहे महत्त्वाचे, वाचा डिटेल्स

 तुम्हाला ज्या देशांमध्ये फळांची निर्यात करायचे आहेत त्या त्या देशांचे विविध मानके आणि निकष असतात, त्यांचे देखील तंतोतंत पालन करणे गरजेचे असते. या माध्यमातून फळांची निर्यात करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे याबद्दल माहिती घेऊ.

 तुम्हालाही करायची आहे फळांचे निर्यात तर या गोष्टींची घ्या काळजी

1- यामध्ये सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्हाला जी फळे निर्यात करायचे आहेत त्याच्यावर कुठलाही प्रकारच्या रोग व किडीचा प्रादुर्भाव नसावा  व ती हिरव्या रंगाची तसेच नाजूक असावी.

2- तसेच काही भागांमध्ये डागाळलेले फळे असतात किंवा काही पिवळी देखील असतात. अशा फळांना निवडून वेगळे करून घेणे गरजेचे असते. म्हणजेच फळांचे प्रतवारी करूनच निर्यातीसाठी फळांची निवड करणे महत्त्वाचे आहे.

3- तुम्हाला ज्या फळांची निर्यात करायची आहे अशा फळांच्या पॅकिंगसाठी तुम्ही जूटच्या धाग्यापासून तयार केलेल्या मोठ्या आकाराच्या पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे जेणेकरून हवा खेळती राहते.

नक्की वाचा:Coconut Farming: शेतकरी बंधूंनो! नारळ फळबागात होतो 'या' रोगांचा प्रादुर्भाव, अशा पद्धतीने कराल नियंत्रण तर मिळेल फायदा

4- फळे गुंडाळण्यासाठी टिशू पेपरचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. यामुळे बाष्पीभवन कमी होते व फळे टिकण्याचा कालावधी वाढतो.

5- थंड वातावरण असताना फळांची तोडणी करणे गरजेचे असते. साधारणपणे तापमान 7 ते 10° आणि आद्रता 90 ते 95 टक्के पर्यंत असावी.

6- टिशू पेपरचा वापर पॅकिंगसाठी करणे गरजेचे असून त्यानंतर कॅरोगेटेड फायबर बोर्ड बॉक्स वापरावे.

7- जी फळे निर्यातीसाठी  पाठवायचे आहे अशा फळांवर कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाचे अवशेष हे एम आर लेव्हल पेक्षा जास्त नसावेत.

8- या बुरशीनाशकावर किंवा कीटकनाशकाचा वापरावर बंदी घातली आहे अशा कीटकनाशकांची फवारणी भाजीपाला पिकामध्ये करू नये.

नक्की वाचा:Crop Protection: फळबागांची कर्दनकाळ आहे फळमाशी, या पद्धतीने कराल नियंत्रण तेव्हाच टळेल नुकसान, वाचा डिटेल्स

English Summary: this is main important thinks to do precaution in fruit export Published on: 04 November 2022, 09:22 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters