पिकांच्या आणि फळबागांच्या लागवडीचा जर आपण विचार केला तर अधिक उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फळबाग असो की पिके यांचे लागवडीतील अंतर किंवा लागवड पद्धत खूप महत्त्वाचे ठरते. आपण खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन इत्यादी बाबींकडे काटेकोरपणे लक्ष देतो. अगदी त्याच पद्धतीने लागवड पद्धतीकडे देखील लक्ष पुरवणे गरजेचे आहे. जर आपण आंबा लागवडीचा विचार केला तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा तर जास्तीच्या उत्पादनासाठी आवश्यक आहेच परंतु आंब्यासाठी लागवड पद्धत महत्त्वाची आहे.
या लेखामध्ये आपण आंबा लागवडी विषयी महत्त्वाच्या असलेल्या घन लागवड पद्धतीची माहिती घेणार आहोत. या पद्धतीचा वापर मराठवाड्यातील शेतकरी केशर आंबा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात करत आहेत.
नक्की वाचा:बांबू लागवड एक हिरवं सोनच, जाणून घ्या लागवड आणि फायदे
आंबा लागवडीसाठी घन लागवड पद्धत नेमकी काय असते?
जर आपण शिफारशीत आंबा लागवड अंतराचा विचार केला तर ते दहा बाय दहा मीटर आहे. परंतु आता घन लागवड पद्धत पुढे येत असून यामध्ये पाच बाय पाच मीटर किंवा 5 बाय सहा मीटर या अंतरावर आंबा लागवड करणे जास्त फायद्याचे दिसून येत आहे. या अंतरावर दोन झाडांमधील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नसल्यामुळे तो पर्यंत आपण या बागेतून दुप्पट ते तिप्पट उत्पन्न मिळवू शकतो.
समजा आपण पारंपारिक दहा बाय दहा मीटर अंतरावर आंबा लागवड केली तर प्रति हेक्टर 100 झाडे लागवड केली जातात.
परंतु जर लागवड पद्धतीचा विचार केला तर यामध्ये हेक्टरी 400 झाडांची संख्या ठेवता येऊ शकते. दुसरे महत्त्वाचा फायदा म्हणजे झाडांचा घेर आणि उंची यामध्ये मर्यादित ठेवता येते. यासाठी शेतकरी बंधू छाटणी आणि वाढ निरोधकांचा वापर करू शकतात.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो चांगल्या उत्पादनासाठी 'या' खताचा करा वापर; होणार लाखोंमध्ये कमाई
घन लागवडीचे फायदे
1- एका ठराविक क्षेत्रामधून जास्त उत्पादन तसेच झाडे लहान असल्यामुळे फळांची विरळणी,विविध कीटकांच्या बंदोबस्तासाठी फवारणी व छाटणी इत्यादी गोष्टी करणे खूप सोपे होते.
2- जेव्हा तुम्ही आंबा फळांची काढणी कराल त्यासाठी झेला किंवा खुडी न वापरता हाताने काढणी शक्य होते. एवढेच नाही तर फळाची गुणवत्ता व प्रत सुधारावी यासाठी वेगळ्या प्रकारचे उपाय सहजपणे करता येतात.
नक्की वाचा:Fertilizer: कोंबडी खताचा 'अशा' पद्धतीने कराल वापर तर पिकांना ठरेल वरदान, येईल पीक जोमदार
Share your comments