कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभरजरी मागणीअसली तरीउन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागामध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडिंचा हमखास उपयोग होताना दिसतो.
अशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावरव अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करू लागला आहे.
जाती
शुगर बेबी,असाहीयामाटो,मधु,अर्का माणिक,अर्का ज्योती, मिलन,तृप्ती,मोहिनी, अमृत इ.
- शुगर बेबी:- फळांची साल गर्द हिरव्या रंगाची,कमी जाडीची असून हिरवट काळे रेखावृत्ता सारखे पट्टे असतात. गोडी जास्त असते.गरभडक लाल रंगाचा रवाळ व गोड असतो.महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
- असाहीयामाटो :- फिकट हिरव्या रंगाची साल असून फळे मोठी असली तरी गोडी कमी असते वचवीस थोडे पांचट असते. त्यामुळे मागील 20 वर्षांपासून ही जात पडद्याआड गेली.
- मधु :- या संकरित जातीची फळे लंबगोल आकाराची असून फळांची साल गर्द हिरवी असते. फळांचे वजन सहा ते सात किलो भरते गरभरपूर व लाल असतो. या दशकात या जातीची मागणी बर्यापैकी होती.
- अर्का माणिक :- या जातीची फआकाराने मोठी, गोल असतात. फळांची साल गर्द हिरव्या रंगाची मध्यम जाड सालीची असते •मिलन :- लवकर तयार होणारी संकरीत जात असून फळे लंबगोल आकाराची असतात. फळाचे वजन सहा ते सात किलो भरते.
- अमृत :-महिको कंपनीची संकरित जात असून फळे मध्यम आकाराची किंचित लंबगोल असूनपाच ते सात किलो वजनाची असतात.फळांच्या सालीचा रंग गर्द हिरवा असतो.. फळांमध्ये बी कमी असते.
संकरीत कलिंगड
- सुपर ड्रॅगन:-ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असूनफळे धरण्याची क्षमता चांगली आहे. फळांचा आकार लांबट गोल असून फळाचे सरासरी वजन 8-10 किलो, सालीचा रंग फिकट हिरवा व त्यावर गर्द हिरवी पट्टे असून गरलाल किरमिजी व रवाळ आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण. ही जात मरफक्यूजॅरियम रोगास सहनशील आहे.
- ऑगस्टा:-ही जात जोमदार व लवकर तयार होणारे आहे. फळांचा आकार उभट गोल असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे.फळाचे सरासरी वजन 6-10 किलो आहे. फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला अतिशय गोड आहे. फळांमध्ये बियांचे प्रमाण कमी असून बियांचा आकार लहान आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट वाण.
- बादशाह :- ही जात जोमदार व लवकर तयार होणारी असून फळे धरण्याची क्षमता चांगली आहे.फळ लांबट गोल आकाराचे गर्द हिरवे पट्टे असलेले फिकट हिरव्या सालीचे असून त्याचे सरासरी वजन 8 ते 10 किलो असते.फळातील गर अतिशय लाल, कुरकुरीत, रवाळ असून,चवीला गोड आहे. दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यास योग्य आहे.
- शुगर किंग :-अतिशय जोमाने वाढणारी मजबूत वेल. फळे गोलाकार असून बाहेरील सालीचा रंग काळपट गर्द हिरवा आहे.
- फळाचा गर आकर्षक लाल असून चवीला गोड आहे.ही जात मर रोगास(फ्युजॅरियम) प्रतिकारक आहे. फळाचे सरासरी वजन 8-10किलो आहे.
- शुगर क्वीन :-या जातीच्या फळांची साल गडद हिरव्या रंगाची,गर लाल व कुरकुरीत असतो. फळांमध्ये साखरेचे प्रमाण 12 ते 14 टक्के असते. तसेच या जातीमध्ये चांगली फळधारणा होते. ही जात लांब वाहतुकीसाठी उपयुक्त आहे आणि फळांची टिकवणक्षमता पण जास्त आहे.
Share your comments