महाराष्ट्रातील एकूण लागवडीखालील जमीन पैकी जवळपास 83 टक्के जमीन कोरडवाहू आहे. त्यामुळे अशा भागातील हलक्या व उथळ जमिनीत पारंपरिक पिकांऐवजी कोरडवाहू फळझाडांची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते.
त्यापैकी सीताफळ हे एक प्रमुख पीक आहे. सिताफळ लागवड करायचे असेल तर सीताफळाच्या 40 ते 50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. त्याबद्दलची माहिती आपण या लेखात घेऊ.
सीताफळाच्या विविध जाती
- अर्का सहान- ही संकरित जात भारतीय बागवानी संस्था, बंगलोर येथे विकसित केली गेली आहे. या जातीची फळे दिसायला आकर्षक गोलाकार असून फळांचा रंग हा फिकट हिरवा तर डोळे पसरट चपटे असतात. यामध्ये गराचे प्रमाण 48 टक्के तर विद्राव्य घटक 31 टक्के असतात. या फळांमध्ये बियांची संख्या कमी असून बिया आकाराने लहान असतात. या जातीवर पिठ्या ढेकूण चे प्रमाण कमी आढळते.
- बाळानगर- आंध्र प्रदेशातील विकसित केलेली आणि महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी ही जात आहे. बाळानगर जातीच्या फळांचे सरासरी वजन 266 ग्रॅम असते. या जातीच्या प्रत्येक झाडापासून 50 ते 60 फळे मिळतात. गराचे प्रमाण 48 टक्के असते.
- धारूर 6- ही जात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी यांनी सन 2014 मध्ये मराठवाडा विभागात लागवडीसाठी प्रसारित केलेली आहे.या जातीची फळे आकाराने मोठी असून गराचे प्रमाण चांगली आहे तसेच विद्राव्य घटकांचे प्रमाण 24.49 टक्के आहे.
- फुले पुरंदर- ही जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी सन 2014 मध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. या जातीची फळे आकर्षक आणि आकाराने मोठी असतात तसेच फळांचे वजन 360 ते 388 ग्राम असते. यामध्ये गराचे प्रमाण 45 ते 48 टक्के आहे. प्रत्येक झाडापासून 118 ते 154 फळे मिळतात. फळात बियांची संख्या कमी असून या जातीच्या फळांच्या गरा पासून तयार केलेल्या रबडीस जास्त मागणी आहे.
Share your comments