1. फलोत्पादन

आवळा लागवड करायची असेल तर या जातीतील बंपर उत्पादन, जाणून घेऊन सविस्तर माहिती

महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन एनए-10 व एनए-7 या जातींची शिफारस आहे. जमिनीचा पोत व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवळ्यामध्ये आंतरपिके घ्यावीत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
amala crop

amala crop

महाराष्ट्रामध्ये आवळा लागवडीसाठी कृष्णा, कांचन एनए-10 व एनए-7 या जातींची शिफारस आहे. जमिनीचा पोत व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आवळ्यामध्ये आंतरपिके घ्यावीत.

आवळा हे भारतीय उपखंडातील सर्वात महत्त्वाचे औषधी व आरोग्यवर्धक फळ आहे. आवळा फळ क जीवनसत्व व टॅनिनचासमृद्ध स्त्रोत आहे. फळांमध्ये सरासरी 100 ग्रॅम मध्ये 700 मिलिग्रॅम अस्कोब्रिकअँसिड आणि लोह, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात.

  • सुधारित जाती:

 महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी कृष्णा, कांचन, एनए -10 व एनए-7या जातींची शिफारस आहे. राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये एनए-10या जातीची लागवड यशस्वीरीत्या केली जाते.

  • बनारसी:- फळांचे वजन 40-45 ग्रॅम, साखरेचे प्रमाण 12.5 % आम्लता 1.5% फळांच्या 100 ग्रॅमखाण्यायोग्य भागात 650 मिलिग्रॅमक जीवनसत्त्वअसतात.

उत्पादन35-38 किलो प्रति झाड

  • कृष्णा :- (एन.-5)

 फळांचे वजन 30-40 ग्रॅम, साखरेचे प्रमाण 11.5 टक्के,आम्लता 1.4 टक्के,100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 475 मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.

  • चकैया :- फळांचे वजन 30-32 ग्रॅम, फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पाचशे मिलिग्रॅम क जीवनसत्व असते. उत्पादन 30 किलो प्रति झाड
  • कांचन:-( एन.-4)

फळांचे वजन 30-32 ग्रॅम, साखरेचे प्रमाण 10 %, आम्लता 1.45 % फळांच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात 500 मिलिग्रॅम क जीवनसत्व असते.

  • आनंद -1 :- फळांचे वजन 35 ग्रॅम, जीवनसत्व क 770 मिलिग्रॅम प्रति 100 ग्रॅम असते उत्पादन 17- 80 किलो प्रति झाड
  • आनंद -2 :-फळाचे वजन 45 ग्रॅम असते जीवनसत्व क चे प्रमाण 100 ग्रॅम ला 775 मिलिग्रॅम असते उत्पादन 100 ते 125 किलो प्रति झाड
  • बी. एस.आर. -1 :- फळांचे सरासरी वजन 27 ते 30 ग्रॅम फळांमध्ये साखरेचे प्रमाण110 % जीवनसत्व क चे प्रमाण 100 ग्रॅम ला 620 मिलिग्रॅम उत्पादन 40 - 45 किलो प्रति झाड.
  • बलवंत (एन..-10):- फळांचे वजन 40 ग्रॅम साखरेचे प्रमाण 9.90%आम्लता 2.17% जीवनसत्व क चे प्रमाण 100 ग्रॅम ला 528 मिलिग्रॅम असते. उत्पादन 42 किलो प्रति झाड.
English Summary: this is benificial veriety of amla crop for more production Published on: 17 February 2022, 01:03 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters