गुळवेल ला संस्कृत मध्ये गुड्डूची वा उमृता तसेच मधुपर्णी अशी अनेक नावे आहेत. गुळवेल ही कषाय रसाची, लघु आणि स्निग्ध गुणाचे तसेच उष्ण वीर्याची तसेच मधुर विपाकाचीआहे. ते पित्त आणि वातनाशक आहे.
तसेच गुळवेल चा वापर सर्वात औषधी म्हणून देखील केला जातो. गुळवेल मध्ये अनेक औषधी कोणती आहेत त्यापैकी टायनोस्पारीनहे महत्त्वाचे आहे.गुळवेल हा शक्तिवर्धक असून त्यामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म भरपूर आहेत. तसेच विविध प्रकारचे तापावर गुणकारी असून संधिवात आणि मधुमेहावरही रामबाण औषध म्हणून गुळवेल समजला जातो. गुळवेल चा वापर चूर्ण, सत्व आणि काढा अशा विविध स्वरूपात मध्ये केला जातो. या लेखात आपण गुळवेलीचे अभिवृद्धि आणि लागवड विषयी माहिती घेऊ.
गुळवेलीचे अभिवृद्धी आणि लागवड
जर गुळवेलीचे बिया पेरल्या तर त्या उगवण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतात. लावलेल्या बियान पैकी 30 ते 35 टक्के बीया उगवतात. परंतु गुळवेलीचा बियांची लागवड करण्याअगोदर त्यांना 24 तास थंड पाण्यात भिजवले तर उगवण क्षमता वाढते व 80 ते 90 टक्क्यांपर्यंत बिया उगवतात. तसेच गुळवेलीचा छाटापासून रोपे करता येतात. यासाठी पेन्सिलच्या जाडी असते तेवढे दहा ते पंधरा सेंटीमीटर लांबी चे छाट घ्यावे लागतात.अशा छाटावर प्रत्येकी पाच ते आठ डोळे असतात.
या डोळ्यात पैकी दोन मातीत जातील अशा पद्धतीने छाटाची लागवड करावी.छाट काढल्यावर त्यांची लागवड करेपर्यंत ते पाण्यात अर्धवट बुडवून ठेवावेत. मात्र 24 तासांच्या आत त्याची लागवड करणे आवश्यक आहे.छाटा ची लागवड सरळ शेतात देखील करता येऊ शकते. त्यांना महिनाभरात मुळे फुटून जवळपास नव्वद टक्के छाटा ना दीड महिन्यात पालवी फुटते. शेतामध्ये गुळवेलची लागवड करण्याआधी वर्षभर जलद गतीने वाढणारे झाडे शेतात लावावी म्हणजे गुळवेल त्यांचा आधार घेत वाढते. नाही तर बांबू सारखा आधार उभा करावा.
गुळवेलची लागवड करण्याआधी जमीन चांगली नांगरून घ्यावी आणि दहा टन शेणखत मिसळून घ्यावे. केवळ गुळवेल लावायचे असेल तर तीन बाय तीन मीटर अंतरावर लागवड करावी.
रोपे लागवड केल्यापासून साधारण तीन महिन्यांनी उरलेले दहा टन शेणखत आणि 75 किलो नत्राचा डोस द्यावा.
गुळवेलची काढणी
उन्हाळ्यामध्ये गुळवेलीचे खोडे बुंध्यापासून काही अंतरावर कापावेत. उद्यापासून पुन्हा अभिवृद्धी होत असल्याने पूर्ण लागवडीची गरज राहत नाही. त्याची कापलेली खोडे बारीक तुकडे करून सावलीत सुकवावेत. गुळवेल च्या चांगल्या सुकवलेल्या खोडाला सध्या 2500 ते 5000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतो.परंतु शेतकरी बांधवांनी महत्त्वाचे म्हणजे लागवड करताना त्यासाठी येणारा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ पाहूनच निर्णय घ्यावा. (संदर्भ-शेतकरीमासिक)
Share your comments