राज्यातील यंदाचा बेदाणा उत्पादनाचा हंगाम संपला आहे. राज्यात सुमारे १ लाख ६० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बेदाणा उत्पादनात दहा हजार टनांनी घट झाली आहे. सतत बदलणाऱ्या हवामानाचा फटका मनुका उत्पादनाला बसला आहे.
वातावरणातील बदलामुळे दर्जेदार मनुका उत्पादनात अडथळे येत होते. यंदाच्या द्राक्ष हंगामात कमालीचे तापमान, अवकाळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. हंगाम लवकर सुरू झाल्याने बेदाणा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस आदींमुळे उत्पादन वाढण्याऐवजी घटले आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे द्राक्षांचे नुकसान झाले. बाजारात द्राक्षे विकली जाणार नसल्याने आणि अपेक्षित भाव मिळत नसल्याने बेदाण्याचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात उत्पादित बेदाणे दर्जेदार नव्हते. अंतिम टप्प्यात १५ मार्चनंतर उत्पादित होणारे बेदाणे दर्जेदार आहेत.
द्राक्षांना बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने बेदाणा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. केवळ नैसर्गिक आपत्तीमुळे यंदाच्या बेदाणा हंगामाच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत १० हजार टनांनी घट झाली आहे. यंदाच्या हंगामात बेदाण्याचे उत्पादन कमी झाले असले तरी, हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाण्याच्या दरात फारशी तेजी-मंदी राहिली नाही, दर स्थिर राहिले.
होळी आणि रमजान सणांनिमित्त बेदाण्याच्या मागणीत ववाढ झाली होती. त्यामुळे दर टिकून राहिले. सध्या बेदाण्याच्या मागणीत सातत्य आहे, मागणी कमी झालेली नाही. सांगली, तासगाव आणि पंढरपूर या तिन्ही बाजारपेठेत आठवडय़ात सरासरी अंदाजे १ हजार ५०० टन बेदाण्याची विक्री होत आहे.
महत्वाच्या बातम्या
राज्यात ६६ हजार लोकांना मिळणार नोकऱ्या, दावोस इकॉनॉमिक कौन्सिलमध्ये ३० हजार कोटींचा करार
News For Pention holder: तुमच्या कुटुंबात देखील कोणाला पेन्शन मिळते का? तर लवकर करा हे काम
Share your comments