आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि कृषी विषयक अभ्यासक्रमामुळे कृषी क्षेत्रात उद्योग आणि व्यवसायाच्या अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. तर शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपण विक्रमी उत्पादन मिळवू शकतो. भारत हा एक कृषी प्रधान देश असल्यामुळे बहुतांशी तरुण जनता ही शेती व्यवसाय करूनच आपली उपजीविका करत आहेत.
काळ्या हळदीमध्ये औषधी गुणधर्म :
सध्या वेगवेगळ्या भागात शेतकरी हळदीचे उत्पन्न घेऊन बक्कळ नफा मिळवत आहे. परंतु आजकाल बाजारात काळ्या हळदीला प्रचंड भाव मिळत असल्यामुळे शेतकरी काळ्या हळदीकडे वळू लागला आहे. हळदीचे मूळ हे आतून काळ्या रंगाचे असते. काळ्या हळदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळून येत असतात. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या सामान्य हल्दीपेक्षा या काळ्या हळदीचे भाव हे अधिक असतात.काळ्या हळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्याने काळ्या हळदीला बाजारात प्रचंड मोठया प्रमाणात मागणी आहे तसेच काळ्या हळदीचा वापर औषधे निर्मितीसाठी तसेच वेगवेगळी सौंदर्यप्रसाधने तसेच तंत्र आणि मंत्र विद्यात सुद्धा काळ्या हळदीचा वापर केला जातो.याचबरोबर काळ्या हळदीचा वापर न्युमोनिया, खोकला, ताप, अस्थमा आदी आजारांवर गुणकारी असल्यामुळे बाजारात प्रचंड मागणी आहे. याशिवाय या हळदीचा लेप डोक्यावर लावल्यास मायग्रेनपासून कायमचा सुटकारा मिळतो. तसेच ल्यूकोडर्मा, मिर्गी सारख्या भयानक आजारांवर काळी हळद गुणकारी आहे.
काळ्या हळदीची शेतामध्ये लागवड ही जून महिन्यात केली जाते. काळी हळद ही पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणावर वाढते. पाणी थांबणाऱ्या जमिनीमध्ये हळदीची वाढ पुरेशी होत नाही. एका हेक्टर क्षेत्रात हळद लागवडीची कमीत कमी 2 क्विंटल बिया लावल्या जातात. तसेच काळ्या हळदीला पाण्याची जास्त गरज अजिबात लागत नाही. अगदी पावसाच्या पाण्यावर सुद्धा आपण काळ्या हळदीची शेती करू शकतो. तसेच लागवडीनंतर हळदी वर जास्त औषधफवारणी चा खर्च होत नाही शिवाय चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेणखताचा अधिक मारा देणे खूप गरजेचे असते.
एका एकर क्षेत्रामध्ये काळ्या आणि ओल्या हळदीचे 50 ते 60 क्विंटल उत्पन्न मिळते तसेच काळी हळद सुकल्यावर त्याचे उत्पन्न 12 ते 15 क्विंटल एवढे अगदी आरामात मिळते. जरी उत्पन्न कमी मिळत असले तर इतर हळदीच्या तुलनेत या हळदीला प्रचंड भाव बाजारात मिळतो. काळी हळद ही प्रतिकिलोला 500 रुपये ते 5000 रुपयांचा उच्चांकी भाव मिळतो. तसेच बऱ्याच ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर सुद्धा ही हळद विकली जाऊ शकते. म्हणजेच 15 क्विंटल काळ्या हळदीपासून तुम्ही 7 ते 8 लाख रुपये मिळवू शकता जरी खर्च सर्व वजा करता 5 ते 6 लाख रुपयांचा निव्वळ फायदा तुम्हला यातून होईल.
Share your comments