चिंच हे पीक (chinch is the crop) विविध हवामान तसेच जमिनीत घेता येते. तामिळनाडू,कर्नाटक केरळ राज्यात चिंचचे व्यापार मोठ्या प्रमाणात चालतो. महाराष्ट्रातील चिंचेला चांगला बाजार आहे.चिंच या पिकाचा वापर चांगल्या पद्धतीने केला जातो आणि एकदा लावलेले रोप अनेक वर्षे उत्पन्न देते.
जमिनीचा प्रकार
चिन्ह हे पीकविविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. जसे की काळ्याभुसभूशीत, रेताळ वाळूमिश्रित, कोरडे आणि डोंगर उतारावर देखील हे पीक घेता येते.
- हवामान:-
समुद्रसपाटीपासून 600 मिटर पर्यंतच्या उंच प्रदेशात चिंच वृक्ष येतो. जास्तीत जास्त 45 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या प्रदेशातही चिंच येते.750 पासून 1250 मि.म.पाऊस पडणाऱ्या प्रदेशात याची वाढ चांगली होते. कमी पावसाच्या प्रदेशात ही हे पीक घेता येते.
- पिकाची जात :-
लागवडीसाठी प्रतिष्ठान, अकोला स्मृती, अजंठा गोड चिंच या जाती निवडाव्यात.
- लागवड:-
एक किलो वजनात 1300 ते 1800 चिंचोके येतात. त्यांची700 रोपे तयार होतात.रोपवाटिकेसाठी मार्च ते एप्रिल महिन्यात गादी वाफे तयार करावेत. या गादीवाफ्यात ताजे बी पेरावे. बिया लावताना त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नसते.परंतु उकळून थंड केलेल्या पाण्यात24तास चिंचोके ठेवल्यास ते चांगले रुजतात. रोप तयार होण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर ही रोपे पॉलिथिनच्या बॅगेत लावावी. त्यानंतर पावसाळ्यामध्ये ही रोपे आपण जमिनीत लावू शकतो. लागवडीसाठी 10×10 मिटर अंतरावर 1मी.× 1 मी.× 1मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये तळालापालापाचोळा, एक पाटी कुजलेले शेणखत, एक किलो सिंगल सुपर फास्फेट वचांगल्या मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. साधारणत: दहा-बारा वर्षात चिंचवड फुलायला व फळाला लागते.
- खत व्यवस्थापन:-
खड्डा भरताना त्यामध्ये तळाला पालापाचोळा टाकून 15 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत + पोयटा माती व 1.5 किलो सिंगल सुपर फास्फेट +100 ग्रॅम यांच्या मिश्रणाने भरावा. पूर्ण वाढलेल्या झाडास ( पाच वर्षानंतर ) 50 किलो शेणखत व 500 :250 :250 ग्रॅम नत्र, स्फुरद व पालाश प्रति झाड द्यावे.
- पाणी व्यवस्थापन:-
हे पिक कमी पाण्यामध्ये ही घेता येते. रोपवाटिकेत रोपे तयार करताना नियमित पाणी द्यावे. त्यानंतर जमीन व पाण्याची उपलब्धता यानुसार पाण्याचे नियोजन करावे.
- रोग नियंत्रण:-
चिंचेवर अनेक प्रकारचे रोग आणि कीटक यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना कधीही चांगल्यासाठी रासायनिक खतांपेक्षा कडूलिंबा पासून बनवलेले चांगली औषधे बाजारात आली आहेत. तसेच कीड रोगावर सल्फरडस्ट, कॅरथीन,क्यालक्सीनही प्रतिबंधक औषधे उपयोगी पडतात. उत्पादन सर्वसाधारणपणे दहा वर्षापासून चांगले उत्पादन मिळते. 50 ते 150 किलो प्रति झाड.
Share your comments