फळांमध्ये आंब्याची राणी म्हणून ओळख असणाऱ्या नुरजहा या जातीच्या आंब्याचे एका फळाचे वजन जास्तीतजास्त चार किलो ग्राम असू शकते. असा अंदाज या विशिष्ट जातीच्या आंबा उत्पादकाने व्यक्त केला.
मध्यप्रदेश राज्यातील अलीराजपुर जिल्ह्यातील कट्टी वाडा भागातनुरजहा या आंब्याच्या प्रजातीची काही झाडे आढळतात.हा परिसर गुजरात राज्याला लागूनआहे व इंदूरपासून 250 किमी अंतरावर असलेल्या काठेवाडा येथील आंबा उत्पादक शिवराजसिंह जाधव म्हणाले की, माझ्या बागेमध्ये नुरजहा आंब्याच्या तीन झाडांवर एकूण 250 फळे असून ते 15 जून पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होतील.
मागच्या वर्षी एका फळाचे वजन होते 3.80 किलो
यावर्षी हवामान बदलांच्या दुष्परिणामांमुळे नुरजहा आंब्याची मोहर झाडावर तग धरू शकले नाही आणि फळात रूपांतर होण्यापूर्वी खाली पडली असे त्यांनी सांगितले. मागच्या वर्षी एका आंब्याचे सरासरी वजन 3.80 किलोग्राम एवढे होते. बोलताना ते म्हणाले की, गुजरात मधील आंबा प्रेमी नुरजहा आंब्याच्या आगाऊ बुकिंग करण्यासाठी फोन करतात.
पण तो आंबा पिकवण्याची आणि विक्रीसाठी तयार होण्यास अजून दीड महिना शिल्लक आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की हवामानाचा भरोसा नसल्यामुळे बेमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी आंब्याचे आगाऊ बुकिंग घेत नाही. मागच्या वर्षी एका फळाचे किंमत पाचशे ते एक हजार पाचशे रुपये होती.
नुरजहा आंब्या बाबत तज्ञांचे मत
बाबतीत तज्ञांनी सांगितले की नुरजहा आंब्याच्या झाडांना साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीपासून फुले येण्यास सुरवात होते आणि जूनच्या पहिल्या पंधरा दिवसात त्याची फळे विक्रीसाठी तयार होतात.
त्यांनी सांगितले की, नुरजहा आंब्याचे फळे एक फूट लांब वाढू शकतात त्यांचे कर्नल चे वजन 150 ते 200 ग्रॅम असते.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:दूध उत्पादन वाढवण्यासाठी अझोला उपयुक्त; लागवड तंत्रज्ञान आणि आश्चर्यजनक फायदे
नक्की वाचा:मोठी बातमी! राज्यात पुन्हा शेतकऱ्यांनाचा संप? सोमवारी होणार मोठा निर्णय
Share your comments