1. फलोत्पादन

नमस्कार! फळबाग लागवड करताय का मग; आधी करा हे काम नाहीतर होणार नुकसान

भारतात जसे हरितक्रांतीचे वारे वाहायला लागले तसे-तसे भारतीय शेतीत अमुलाग्र बदल घडायला लागले. असाच एक बदल म्हणजे पारंपारिक पीकपद्धतीला फाटा देत आता शेतकरी राजा नकदी पिकांकडे वळू लागला. आता बऱ्याचशा भागात फळबाग लागवडिकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चाललाय आणि ह्याच प्रमुख कारण म्हणजे फळबाग हे शेतकऱ्यांना खात्रीशीर उत्पन्न मिळवून देते.परंतु फळबाग लागवडीतून चांगले उत्पादन व उत्पन्न प्राप्त करण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
orchard planting

orchard planting

भारतात जसे हरितक्रांतीचे वारे वाहायला लागले तसे-तसे भारतीय शेतीत अमुलाग्र बदल घडायला लागले. असाच एक बदल म्हणजे पारंपारिक पीकपद्धतीला फाटा देत आता शेतकरी राजा नकदी पिकांकडे वळू लागला. आता बऱ्याचशा भागात फळबाग लागवडिकडे शेतकऱ्यांचा कल वाढत चाललाय आणि ह्याच प्रमुख कारण म्हणजे फळबाग हे शेतकऱ्यांना खात्रीशीर उत्पन्न मिळवून देते.परंतु फळबाग लागवडीतून चांगले उत्पादन व उत्पन्न प्राप्त करण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

 कोणत्याही फळबागेची संपूर्ण माहितीशिवाय बाग लावणे हा तोट्याचा सौदा ठरू शकतो त्यामुळे फळबागेची संपूर्ण माहिती घेऊन शास्त्रीय पद्धतीने बाग लावणे कधीही चांगले सिद्ध होईल. फळांचे उत्पादन आणि आपल्या भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर, आपल्या देशाचे आणि राज्याचे एकूण फळांचे उत्पादन अजून कमीच आहे, आणि म्हणुनच फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी फळांच्या बागा लावणे अत्यावश्यक आहे.

 फळबाग लागवड करण्याआधी काही गोष्टींची काळजी घ्या

 »फळबाग लागवड योजना

बहुतेक फळझाडे हि बहुवार्षिक उत्पादन देणारे असतात. म्हणून, फळबागांची अशा प्रकारे लागवड केली पाहिजे की तुम्हाला फळबागचा फायदा होत राहील, फळबाग दिसायला चांगली दिसेल, कमी खर्चात कसे उत्पादन घेता येईल याची काळजी घ्यावी, झाडे निरोगी ठेवावीत आणि बागेत उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर करावा.

. बागेची योजना करने म्हणजे बाग अशी असावी की प्रत्येक फळझाडाला पसरण्यासाठी योग्य जागा मिळायला हवी आणि वावरात कचरा असता कामा नये आणि सर्व सुविधा जसे की खत-खाद्य, पाणी, फवारणी इत्यादी प्रत्येक झाडाला सहज उपलब्ध होतील ह्याची खातरजमा करने गरजेचे आहे.

फळांच्या चांगल्या उत्पादनासाठी पाणी, माती आणि हवामान इ. चांगले असावे. बागेत काम करण्यासाठी मजूर आणि तांत्रिक कामगार असावेत. जेणेकरून फळबाग फेल जाणार नाही आणि उत्पादन चांगले येईल.

 »जमीन कशी निवडणार फळबागसाठी

आपण आपल्या जवळच्या कृषी पर्यवेक्षकाद्वारे प्रधानमंत्री मृदा आरोग्य कार्ड योजनेअंतर्गत मृदा परीक्षण पूर्ण करू शकता. फळबाग लागवडीसाठी जमीन ही खोलीची असावी l, लोममाती किंवा रेताड चिकणमाती माती फळांच्या बागांसाठी चांगली आहे तसेच, जमिनीत खोलवर कुठलाही कडक थर नसावा म्हणजेच जमीन खडकाळ नसावी आणि जमिनीत भरपूर खत असावे आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन असावी.  मनुका, आवळा, खजूर आणि बेलपात्र यासारखी फळे खारट आणि क्षारीय जमिनीत लावावीत.

 

झाडांची निवड कशी करणार

ह्यासाठी आपण कृषी विशेषज्ञचा सल्ला अवश्य घ्या. साधारणपणे महाराष्ट्रात डाळिंब, आंबा, पपई, गुसबेरी, आवळा, लिंबू, मोसंबी, संत्रा, डाळिंब, द्राक्षे इत्यादी फळांची सहज लागवड करता येते. आंबा, पपई आणि द्राक्षाच्या फळांची लागवड त्या भागात करू नये जिथे दंव अथवा दड अधिक प्रमाणात पडते ह्यामुळे उत्पादनावर फरक पडतो. द्राक्षेची झाडे जास्त उष्णता असलेल्या भागात लावावीत. जास्त आर्द्रता असलेल्या भागात हंगामी, संत्राची झाडे लावावीत.

 

»पाणी व्यवस्थापन कसे असावे

बाग लावण्यापूर्वी, पाण्याचे व्यवस्थापन कसे केले जाईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.  आपल्या भागात पाण्याची टंचाई भासत असेल तर, ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा, ज्यामुळे पाणी आणि मेहनत दोन्हीची बचत होईल आणि आवश्यकतेनुसार झाडांना पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे उत्पन्न वाढेल. जर आपल्या वावरात पाणी साचत असेल तर वावरात ड्रेनेजची योग्य व्यवस्था करावी.

 

English Summary: take precaution before fruit orchard cultivation Published on: 26 September 2021, 12:03 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters